AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुणे बलात्कार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय, दत्ता गाडेला पुन्हा गावात आणलं, होणार मोठा खुलासा

मोठी बातमी समोर आली आहे, पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या गुणाट गावात आणलं आहे.

मोठी बातमी! पुणे बलात्कार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय, दत्ता गाडेला पुन्हा गावात आणलं, होणार मोठा खुलासा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 07, 2025 | 6:19 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. पुणे अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्वारगेट येथे बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या गावी गुणाटला आणलं आहे. दत्ता गाडे फरारी असताना गुणाट गावातील शेत शिवारात कुठे कुठे लपला होता? आता त्या त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन जाणार आहेत. दत्तात्रय गाडे याने आपला मोबाईल गुणाट गावाच्या शेत शिवारात पुरून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. तर दुसरीकडे मात्र आपला मोबाईल हरवल्याचा दावा आरोपीकडून करण्यात आला आहे. हा मोबाईल पोलिसांना मिळाल्यास त्यातून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलचा शोध सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. दरम्यान तरुणीच्या वैद्यकीय अहवालामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, या तरुणीवर दोनदा अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, तो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी गुणाट गावातूनच त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

असं केलं अटक 

अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी हा पुन्हा आपल्या गावात आला, जणू काही घडलचं नाही अशा थाटात तो होता. मात्र त्यानंतर ही घटना उघड झाल्यानंतर तो फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथकाची नियुक्ती केली होती. तो गावातच लपण्याचा संशय पोलिसांना होता. अखेर पोलिसांनी रात्रीच्या सुमासार त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे, मात्र पोलिसांना त्याचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा गुणाट गावात आणण्यात आलं आहे, त्याने आपला मोबाईल लपून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र आपला मोबाईल हरवल्याचा दावा त्याने केला आहे.

.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?