AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंड गजा मारणे कोण? माहीतच नव्हते… खासदार निलेश लंके यांचा दावा

अजित पवार गटाकडून टीका होत आहे, त्यावर बोलताना निलेश लंके म्हणाले, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे. गजा मारणे कोण होता, हे मला माहीत नव्हते. मला त्या व्यक्तीची ओळखच नाही.

गुंड गजा मारणे कोण? माहीतच नव्हते... खासदार निलेश लंके यांचा दावा
nilesh lanke and gajanan marane
| Updated on: Jun 14, 2024 | 3:45 PM
Share

पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेणे अन् त्याच्याकडून सत्कार स्वीकरण्याचा प्रकार खासदार निलेश लंके यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या प्रकारानंतर अडचणीत आलेल्या खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे कोण होता, हे माहीत नव्हते. कळत न कळत माझ्याकडून चूक झाली, अशी भूमिका ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना व्यक्त केली. गुंड गजानन मारणे याने नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निलेश लंके यांच्यावर घणाघाती हल्ला करण्यात आला. त्याला निलेश लंके यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले निलेश लंके

मी दिल्लीवरुन आलो. माझे पवार नावाचे सहकारी होते. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो. त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला चार सहा लोकांनी थांबवले. त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले. आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहीत नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली. तो एक अपघात होतो. कळत न कळत चूक झाली.

मतदार संघात गुंड प्रवृत्तीचे कोणीच नाही

अजित पवार गटाकडून टीका होत आहे, त्यावर बोलताना निलेश लंके म्हणाले, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे. गजा मारणे कोण होता, हे मला माहीत नव्हते. मला त्या व्यक्तीची ओळखच नाही. माझ्या मतदार संघात एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती नाही, त्यामुळे निवडणुकीत गजा मारणेची मदत झाल्याचा प्रश्नच येत नाही, असे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

निलेश लंकेची खरी प्रतिमा समोर – उमेश पाटील

अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खासदार निलेश लंकेवर जोरदार हल्ला केला. समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके हे गजानन मारलेला भेटले. त्यामुळे त्यांची खरी प्रतिमा राज्यासमोर आली आहे. इतकेच नाही निलेश लंकेचे कार्यकर्ते एमआयडीसीमधून कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती आहे, असा दावा उमेश पाटील यांनी केला.

कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...