AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरचे नवीन खासदार निलेश लंके वादात अडकणार, गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार

mp nilesh lanke meet gajanan marne: गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती.

नगरचे नवीन खासदार निलेश लंके वादात अडकणार, गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार
| Updated on: Jun 14, 2024 | 2:07 PM
Share

अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यानंतर निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगणार आहे. राजकाणातील गुन्हेगारीकरण यामुळे समोर आले आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते.

कोण आहे गजा मारणे

गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

लोकसभेत असा झाला विजय

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना निलेश लंके यांनी पराभूत केले होते. या निवडणुकीत निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली होती. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 28 हजार 929 मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश अन् लोकसभेचे तिकीट

निलेश लंके लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. आता गुंड गजा मारणे याची भेट निलेश लंके यांनी घेतल्यानंतर शरद पवार काय बोलतात? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी खंडणी गोळा करुन दिली म्हणून…

खासदार निलेश लंके आणि गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, अजितदादांवर आरोप करणारे रोहित पवार हे कर्जत जामखेडच्या विधानसभा निवडणुकीत गुंड निलेश धायवळला घेऊन फिरत होते. याउलट समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके हे गजानन मारलेला भेटले. निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले त्यामुळे त्यांची प्रतिमा महाराष्ट्रसमोर आली आहे. निलेश लंकेचे कार्यकर्ते एमआयडीसीमधून कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती आहे.

निवडणुकीसाठी खंडणी गोळा करून दिलेल्या लोकांना कृतज्ञता म्हणून निलेश लंके हे गजा मारणेला भेटायला गेले नसतील का? एखाद्या राजकारणाबरोबर गुंडाचा फोटो छापून येणे ही बाब वेगळी मात्र त्या गुंडाचा सत्कार करायला किंवा स्वीकारायला जाणे ही बाब निश्चितपणे आक्षेपार्ह आहे.त्यामुळे निलेश लंके खासदारकीला कसे आणि कोणामुळे निवडून आले हे स्पष्ट झालेले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.