AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रलंबित MPSC नियुक्त्या पूर्ण करण्यासाठी अध्यादेश काढा, विद्यार्थ्यांची मागणी

एमपीएससीने 2017 मध्ये घेतलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2019 मध्ये लागला. कागदपत्रे पडताळणीनंतर एकूण 832 उमेदवारांची शिफारस नियुक्तीसाठी करण्यात आली.

प्रलंबित MPSC नियुक्त्या पूर्ण करण्यासाठी अध्यादेश काढा, विद्यार्थ्यांची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 8:36 AM
Share

पुणे : एमपीएससीने 2017 मध्ये घेतलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2019 मध्ये लागला. कागदपत्रे पडताळणीनंतर एकूण 832 उमेदवारांची शिफारस नियुक्तीसाठी करण्यात आली. परंतू मार्च 2020 पासून आतापर्यंत 832 पैकी 785 उमेदवारांचीच नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली, 47 प्रलंबित राहिले. त्यामुळे यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून उर्वरित जागांसाठी नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी होत आहे. तसेच यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश काढला तर एमपीएससीकडून नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असंही मत व्यक्त केलंय.

एमपीएससीच्या नियमावलीनुसार परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत प्रतीक्षा यादी ग्राह्य धरली जाते. या कालावधीत पदासाठी पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष नियुक्तीनंतर निवड यादीतील उमेदवार काही कारणाने हजर न झाल्याने किंवा अन्य कारणाने पदे रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची शिफारस केली जाते. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2017 चा निकाल सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर झाला. मात्र मार्च 2020 पासून लागलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे मोटार वाहन विभागाला संपूर्ण नियुक्ती प्रक्रिया विहित मुदतीत पार पाडता आली नाही.

“प्रतीक्षा यादीतील 47 उमेदवार संभाव्य संधीपासून वंचित”

विहीत मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रतीक्षा यादीतील 47 उमेदवार संभाव्य संधीपासून वंचित राहिले. हे पाहता मानवी दृष्टिकोनातून तसेच कोणावरही अन्याय होऊ नये ही भूमिका घेऊन या प्रतीक्षा यादीला विशेष बाब म्हणून विहीत मुदतीनंतर मुदतवाढ देणे गरजेचे आहे, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी मांडलीय.

“लॉकडाऊनचा कालावधी नियुक्ती कालावधीमध्ये मोजू नये”

कोरोना काळातील लॉकडाऊनच्या कालावधीतीत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण थांबली असल्याने लॉकडाऊनचा कालावधी हा नियुक्ती प्रक्रियेसाठी विहित केलेल्या कालावधीमध्ये म्हणून मोजू नये. कोरोनाचे संकट हे देशव्यापी नैसर्गिक आपत्ती असल्याने या काळात प्रलंबित राहिलेल्या नियुक्त्यांसाठी वाढीव कालावधी द्यावा, असा अध्यादेश शासनाकडून एमपीएससीला प्राप्त झाल्यास नियुक्त्यांचा मार्ग सुकर होईल. कोरोना संकटात अडकलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठीची संधी शासनाकडे असून लवकरच हा अध्यादेश निघावा, अशी मागणी परिक्षार्थींनी केली आहे.

अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, प्रलंबित उमेदवारांच्या प्रतिक्रिया

प्रलंबित उमेदवार राजकुमार देशमुख म्हणाले, “सामान्य प्रशासन विभागाने कोरोना काळातील प्रलंबित नियुक्ती प्रक्रियेसाठी वाढीव कालावधी देण्याबाबतचा अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.” “कोरोना परिस्थितीतील लॉकडाऊन आणि त्यामुळे अडकलेल्या नियुक्त्या यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत असून शासन याची मानवतेच्या दृष्टिकोनातून दखल घेईल,” अशी अपेक्षा दत्तात्रय दुरगावळे आणि अमित टाके यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

मोठी बातमी, MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईलवर राज्यपालांची सही, दत्तात्रय भरणेंच्या भेटीला यश

MPSC ला जागा देण्यास 2 वर्षे, पुरावेळी फडणवीसांची महाजनादेश यात्रा, फेसबुक पोस्टमधून रोहित पवारांनी भाजपचा इतिहास काढला

अजित पवारांच्या घोषणेनंतर ‘एमपीएससी’ भरतीप्रक्रियेला वेग; 4 सप्टेंबरला दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा

व्हिडीओ पाहा :

MPSC students demand order to appoint pending RTO appointments

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.