AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी महामंडळाचा सर्वात मोठा निर्णय, ‘त्या’ वाहनचालकांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार

एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बस चालवत असताना मोबाईलचा वापर करणं, मोबाईलवर बोलणं, मोबाईला एअरफोन लावून गाणी ऐकणं वाहनचालकांना भारी पडणार आहे. कारण तशाप्रकारचं कृत्य करणाऱ्या वाहनचालकांवर एसटी महामंडळ आता मोठी कारवाई करणार आहे.

एसटी महामंडळाचा सर्वात मोठा निर्णय, 'त्या' वाहनचालकांना  थेट घरचा रस्ता दाखवला जाणार
msrtc strike
| Updated on: Nov 20, 2023 | 7:16 PM
Share

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 20 नोव्हेंबर 2023 : एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे एसटी गाडी चालवताना चालक फोनवर बोलताना आढळल्यास त्या चालकावर थेट कारवाई होणार, असा मोठा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. तसेच गाडी चालवताना कानात हेडफोन घालून गाणी ऐकता येणार नाहीत. तसेच गाडी चालवताना चालकास व्हिडीओ पाहण्यासही प्रतिबंध असणार आहे. एसटी महामंडळाकडे याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबतच्या सातत्याने तक्रारी वाढत असल्याने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. अखेर जास्त तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला. एसटी महामंडळ अशा वाहनचालकांवर आता थेट निलंबनाची कारवाई करणार आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मेळणार आहे. कारण दररोज लाखो नागरीक दररोज एसटीने प्रवास करतात. एसटीला प्रवाशांकडून प्रचंड महसूलही मिळतो. पण ज्या एसटीने प्रवासी प्रवास करतात त्यांना पैसे देवूनही जीवाची भीती वाटत असेल, तर अशा प्रवासाला अर्थ नाही. प्रवासी पैसे देवून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना सुखरुप असा प्रवास आहे. काही चालकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलल्यामुळे अशाप्रकारच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलंय?

एसटी महामंडळाकडून याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. “एसटी बस चालवत असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत”, असं एसटी महामंडळाने प्रसिद्धी पत्रकारत म्हटलंय.

“एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक आणि प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते”, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

“याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत”, अशी माहिती एसटी महामंडळाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.