बारामतीत आंतरजातीय लग्न, आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि खूनाची कबुली दिली. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात ही हत्या झाली. ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19) असे मुलीचे नाव आहे. ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, मुलगा तिला नांदवायला नेत […]

बारामतीत आंतरजातीय लग्न, आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि खूनाची कबुली दिली. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात ही हत्या झाली. ऋतुजा हरीदास बोभाटे (वय 19) असे मुलीचे नाव आहे.

ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, मुलगा तिला नांदवायला नेत नव्हता. त्यामुळे मुलीने नवऱ्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. आईनेही मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मुलगी माहेरीच राहात होती.

दरम्यान, यामुळे मुलगी ऋतुजा आणि आई संजीवनी हरीदास बोभाटे यांच्यात सारखे वाद व्हायचे. कधी कधी इतर शुल्लक घरगुती कारणांनीही भांडणे व्हायची. हत्येच्या दिवशी देखील मुलीत आणि आईत भांडण झाले. अखेर संतापलेल्या आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. हत्येनंतर आई संजीवनी बोभाटे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्या.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.