AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य, आता सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार!

पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य झाले आणि आता थेट सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार हाकणार आहेत.

पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य, आता सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार!
सरपंच आणि उचसरपंच श्री व सौ. पठारे
| Updated on: Feb 10, 2021 | 2:51 PM
Share

अहमदनगर : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram panchayat Election) अनेक कहाण्या बघायला, ऐकायला मिळाल्या. बायकोने नवऱ्याला उचलून घेतल्याचं महाराष्ट्राने पाहिलं, तर आपल्या लाडक्या ‘सौं’ च्या यशाने हुरळून जाऊन नवरोबाने थाटात उचलून घेत बायकोची गावातून मिरवणूक काढली. आता नगरची अशीच एक आगळीवेगळी कथा आहे. पहिल्यांदा नवरा-बायको बिनविरोध सदस्य झाले आणि आता थेट सरपंच-उपसरपंच बनून हाकणार गावचा कारभार हाकणार आहेत. (Nagar Husband wife first unopposed member then Elected As A Sarpach And Deputy Sarpanch )

जयश्री सचिन पठारे (Jayashreee Sachin Pathare) या सरपंच तर त्यांचे पती सचिन पठारे (Sachin Pathare) हे उपसरपंच झाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात या दोघा नवरा बायकोच्या राजकीय यशाची चर्चा रंगली आहे. वाळवणे ग्रामपंचायत सदस्यावर आता नवरा-बायको अधिकार गाजवणार आहेत.

वाळवणे गावची 2 हजार लोकसंख्या असून 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकी 4 बिनविरोध सदस्य झाले असून त्यात हे दोघेही नवरा-बायको बिनविरोध निवडून आले.

निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने हा मान जयश्री पठारे यांना मिळाला असून गावाने त्यांचे पती सचिन पठारे यांना उपसरपंच करायचं ठरवलं आहे. त्यामुळे दोघेही आता सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले आहे.

निवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच पठारे यांनी टीव्ही 9 शी बोलताना त्यांच्या राजकीय यशाबद्दल आनंद व्यक्त केला. “आम्ही आज खूप आनंदी आहोत. गावाने आम्हाला गावचा गावगाडा हाकण्याची संधी दिलीये. असं गाव आणि गावकरी फार थोड्या लोकांच्या नशिबी असतात. गावाने आता आम्हाला सरपंच-उपसरपंच करुन त्यांच्या सेवेची संधी दिली आहे. आम्ही येणाऱ्या काळात गावची सेवा करु. पूर्ण मेहनत करुन गावचं रुपडं पालटून टाकू, अशी प्रतिक्रिया श्री व सौ. पठारे यांनी दिली.

(Nagar Husband wife first unopposed member then Elected As A Sarpach And Deputy Sarpanch)

हे ही वाचा :

अजित पवारांनी पेटारा उघडला, चॅलेंज फंडमधून अव्वल जिल्ह्याला 50 कोटी देणार

बजेटमध्ये नाट्यगृहांचा विचार करा, एफडीच्या व्याजातून मेंटेनन्स करा, प्रशांत दामलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.