अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आता आणखी मोठी जबाबादारी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर याबाबतच्या खऱ्या घडामोडी प्रत्यक्षात बघायला मिळणार आहेत.

अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?
NCP Ajit pawar group
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 6:34 PM

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच त्यांची ‘पॉवर’ काय आहे ते स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या गटाला पॉवरफुल खाती मिळाली आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध होता. पण नंतर अनेक बैठका पार पडल्यानंतर अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं. याशिवाय शिंदे गटाकडे असणारं कृषी खातं देखील अजित पवार यांच्या गटाकडे गेलं. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे राज्याचे नवे कृषीमंत्री झाले आहेत. तसचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे असणारं अन्न आणि औषध प्रशासन खातंदेखील अजित पवार यांच्या गटाकडे गेलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री धर्मरावबाब आत्राम यांना आता अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबादारी मिळाली आहे. तसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार मदत-पुनर्वसन खातं राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील याांच्याकडे गेलं आहे. सत्तेत तिसरा पक्ष सहभागी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निर्णय घ्यावे लागले. असं असलं तरी आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

अजित पवार गट पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतही बाजी मारणार?

राष्ट्रवादी काँग्रसेच्या आतापर्यंत 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. तसेच आगामी मंत्रीमंडळ विस्तारात आणखी दोन मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खातेवाटपात जशी अजित पवार यांनी बाजी मारली, तशीच बाजी आता ते पालकमंत्रीपदातही मारण्याची दाट शक्यता आहे. कारण सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार गटाला किती पालकमंत्रीपद मिळणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 10 पालकमंत्री पद मिळणार आहेत. विशेष म्हणजे पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याचकडे जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं सरकार असतानाही अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर आतादेखील तेच पुण्याचे पालकमंत्री असण्याची शक्यता आहे.

राज्य विधीमंडळाचं येत्या सोमवारपासून (17 जुलै) पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे असणार आहे. या अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्री बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन आगामी काळात कदाचित भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.