AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचा हात जिथे लागतो, तिथे उलट सुलट होतंय, शरद पवार यांचा चिमटा

राज्यभरात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पुतळा अवघ्या सहा महिन्यातच कोसळल्याने महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. रविवारी मविआकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधान मोदींना चिमटा काढला.

मोदींचा हात जिथे लागतो, तिथे उलट सुलट होतंय, शरद पवार यांचा चिमटा
शरद पवार आणि नरेंद्र मोदी
| Updated on: Sep 01, 2024 | 11:11 PM
Share

मालवण येथे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यांआधी बसवण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. महाराजांचा हा पुतळा कोसळल्याने राज्यभरातील शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. या पुतळ्यावरून राज्यातील सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राज्यभरात मविआकडून मालवणमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मोदींना चिमटा काढला आहे.

आम्ही मालवण येथील घटनेचा निषेध केला अनेकजण उपस्थित होते, अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. 1960 साली यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याकडे पुतळा बसवला त्याला अजूनही काही झालेलं नाही पण यांचा पुतळा 6 महिन्यात पडला. त्या पुतळ्याच्या उदघाटनाला आलं कोण तर मोदी. त्यांचा हात जिथ लागतोय तिथं काहीतरी उलटं सुलट होत असल्याचं म्हणत शरद पवार यांनी थेट मोदींवरच निशाणा साधला.

हे राज्य हे रयतेच राज्य आहे हिंदवी स्वराज्य आहे. सैन्य लढायला जरी गेलं तरी शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नका असं आदेश महाराजांनी दिले. अनेक लोक इकडे जुन्नरचे आहेत तुम्हाला काय महाराजांचा इतिहास काय सांगायचा. ज्याच्या हातात सत्ता आहे. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. परीक्षेत बसणारी मुलं दहा दिवस संघर्ष करतात. हे राज्यकरते तुमच्या हिताचे नाहीत. नरेंद्र मोदी सांगतात की शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत त्यांनी असंही म्हटलं की मी पवार साहेबांच बोट धरून आलो आहे आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटतेय, असंही शरद पवार म्हणाले.

आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी लोकांमध्ये अस्वस्थता दिसते. महाराष्ट्राची स्थिती आव्हाड यांनी सांगितली. या महाराष्ट्रात जनतेने चार वेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. याच जनतेमुळे मला अनेक जबाबदाऱ्या घेण्याची संधी मिळाली. मला आठवतंय की ज्या वेळी शेती व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आली मी शपथ घेतली आणि घरी आलो अधिकाऱ्यांनी पहिली फाईल माझ्यासमोर आणली. देशात अन्न धाण्याचा साठा कमी झालाय मी फार अस्वस्थ झालो. जगाचा पोशिंदा शेतकरी आणि आपल्या देशात दुसऱ्या देशात अन्न धान्य बाहेर आणावं लागल पण त्यानंतर भारत जास्त गहू पिकवणारा देश झाल्याची आठवण शरद पवारांनी सांगितली.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.