AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | रोहित पवार आणि सत्यजित तांबे एकाच बॅनरवर, पुणे-अहमदनगर जिल्ह्यांमध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या आहेत. काही घडामोडी तर कल्पनेच्याही पलिकडे घडल्या आहेत. या घटनांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. असं असताना आता पुण्यात लावण्यात आलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा आहे.

Pune News | रोहित पवार आणि सत्यजित तांबे एकाच बॅनरवर, पुणे-अहमदनगर जिल्ह्यांमध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
| Updated on: Sep 28, 2023 | 1:03 AM
Share

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीवेळी नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडून आलेल्या बघायला मिळाल्या होत्या. या निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी काँग्रेसकडून तत्कालीन आमदार सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्याचं ठरलं होतं. या निवडणुकीत सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढवली होती. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणामुळे तांबे आणि थोरात कुटुंबात गृहकलक झाल्याची चर्चा होती.

विशेष म्हणजे याच प्रकरणामुळे महाराष्ट्रात काँग्रेसमधील दोन गटांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती आणि ते जिंकूनही आले होते. या निवडणुकीत भाजपचा सत्यजित तांबे यांना छुपा पाठिंबा असल्याचीदेखील चर्चा होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सत्यजित तांबे यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे सत्यजित तांबे भाजप पक्षात प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण पुढे तसं काही घडलं नाही.

पुण्यातील बॅनरमुळे चर्चांना उधाण

या सर्व घडामोडी घडून आता बराच काळ लोटलाय. आगामी काळात लोकसभा आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याशिवाय राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकांचं बिगूल कधीही वाजू शकतं. यामध्ये पुणे महापालिकेचा देखील समावेश आहे. असं असताना पुण्यात आज एक अनोखं राजकीय बॅनर बघायला मिळालं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

बॅनरमध्ये नेमकं काय?

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार आणि सत्यजीत तांबे यांचे एकत्रित बॅनर बघायला मिळाले आहेत. या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा देणारं हे बॅनर लावण्यात आलं आहे. संबंधित बॅनर पुण्याच्या हडपसर भागात लागले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचादेखील फोटो बघायला मिळाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काही नवी राजकीय समीकरणांची तर ही नांदी नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.