वारा आणि आभाळ बघून आम्ही शेत कधी नांगरायचे हे ठरवतो; अमोल कोल्हे यांच्या सूचक विधानाचा अर्थ काय?

निवडणुका खूप लांब आहेत. आताच पक्षांतर, नाराजी आदी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आकारण त्याविषयी काहीतरी बातम्या पेरत राहणं किंवा त्याविषयी चर्चा करणं मला अनाठायी वाटतं.

वारा आणि आभाळ बघून आम्ही शेत कधी नांगरायचे हे ठरवतो; अमोल कोल्हे यांच्या सूचक विधानाचा अर्थ काय?
वारा आणि आभाळ बघून आम्ही शेत कधी नांगरायचे हे ठरवतोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 10:02 AM

पुणे: भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं आहे. पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्या ऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक विधान करून एकप्रकारे बळ देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आढळराव पाटीलच काय अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं विधान केलं होतं. त्यावर अमोल कोल्हे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, राजकीयदृष्ट्या त्यांच्या विधानात काही गैर नाही, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

तसेच, वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचे हे आम्ही ठरवत असतो, असंही कोल्हे यांनी सांगितलं. अमोल कोल्हे यांचं हे सूचक विधान आणि भाजपने आतापासूनच शिरूर मतदारसंघात सुरू केलेले दौरे यामुळे अमोल कोल्हे भाजप सोडण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपाला आपली सत्ता टिकविण्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसणं यात राजकीयदृष्ट्या चुकीचं नाही. 2014 मध्ये येथील मतदारांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला शिरूर लोकसभेतून मोठ्या विश्वासाने संसदेत पाठविले. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली. मतदारांचा विश्वास असाच टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असं ते म्हणाले.

निवडणुका खूप लांब आहेत. आताच पक्षांतर, नाराजी आदी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आकारण त्याविषयी काहीतरी बातम्या पेरत राहणं किंवा त्याविषयी चर्चा करणं मला अनाठायी वाटतं. निवडणूक हे माध्यम आहे, तर सत्ता हे साधन आहे. साध्य आहे ते आपल्या मतदारांचा विश्वास सार्थ ठेवण्याचं. विकासाची वाट धरून लोक कल्याणाची कामे करण्याचं. तोच प्रयत्न मी करत राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.