AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्यासाठी शरद पवार आक्रमक, आता सुरु केले…

Pune Ajit Pawar News | राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. आता राष्ट्रवादी कोणाची यावर सुनावणी निवडणूक आयोगापुढे ऑक्टोंबर महिन्यात होणार आहे. परंतु शरद पवार चांगलेच आक्रमक झालेय.

Ajit Pawar | अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावण्यासाठी शरद पवार आक्रमक, आता सुरु केले...
| Updated on: Sep 16, 2023 | 2:27 PM
Share

रणजित जाधव, पुणे | 16 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षाभरापासून धगधग सुरु होती. अखेर जुलै महिन्यात अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत भाजप-शिवसेना युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर त्यांच्या सोबत गेलेले नऊ जण मंत्री झाले. अजित पवार यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. आता अजित पवार यांचा बालेकिल्ला फोडण्यासाठी शरद पवार आक्रमक झाले आहे.

शरद पवार पोहचले जनतेत

अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर शरद पवार शांत बसले नाही. त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन पक्ष उभारणी सुरु केली. शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेण्याचा धडका लावला. त्यामुळे अजित पवार गटातील आमदार अस्वस्थ झाले. आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्या ज्या ठिकाणी सभा होत आहे, त्याठिकणी उत्तर सभा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नुकतीच कोल्हापूर येथे सभा घेतली होती.

आता शरद पवार अजित दादांच्या बालेकिल्ल्यात

पुणे शहरातील पिंपरी चिंचवड म्हणजे अजित पवार यांचा बालेकिल्ला. एकेकाळी पिंपरी चिंचवड हा अजित पवार हे समीकरण होते. अजित पवार यांचा बालेकिल्ल्या फोडण्यासाठी शरद पवार यांनीही कंबर कसली आहे. शरद पवार गटाने अजित पवार यांच्या बालेकिल्लात आपले स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात हे कार्यालय असणार आहे.

का केले कार्यालय

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलंबित करण्यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गट आक्रमक झाला आहे. अजित पवार यांना रोखण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे.

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.