AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात वशाटोत्सवाचं आयोजन, शरद पवार, संजय राऊतांसह आव्हाड-मुंडे उपस्थित राहणार

राज्यभरातून मोठ्या संख्येने खवय्ये वशाटोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. (NCP Vashatotsav in Pune )

पुण्यात वशाटोत्सवाचं आयोजन, शरद पवार, संजय राऊतांसह आव्हाड-मुंडे उपस्थित राहणार
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 18, 2021 | 9:07 AM
Share

पुणे : पुण्यात येत्या शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. (NCP Vashatotsav in Pune Sharad Pawar Sanjay Raut to attend)

कोण कोण उपस्थित राहणार?

राज्यभरातून मोठ्या संख्येने खवय्ये वशाटोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.

वशाटोत्सवाला परवानगी कशी?

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सवाचं आयोजन केलं आहे. एकीकडे कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मग राष्ट्रवादीच्या वशाटोत्सवाला परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संगीत संत तुकाराम नाटक रद्द

विशेष म्हणजे वशाटोत्सवात ‘संगीत संत तुकाराम’ हे नाटक आयोजित करण्यात आलं आहे. मात्र वारकरी संप्रदायातील काही लोकांच्या आक्षेपामुळे वशाटोत्सवात आयोजित हे नाटक रद्द करावं लागलं.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचं आयोजन सध्या राज्यभरात करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.

संबंधित बातम्या :

जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनर्सवरुन नाथाभाऊ गायब; खडसेंच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची गटबाजी

आधी राष्ट्रवादीची ‘परिवार संवाद यात्रा’ आता शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत ठरलं, मध्यवधीची धास्ती?

(NCP Vashatotsav in Pune Sharad Pawar Sanjay Raut to attend)

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...