AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शंका ठेऊ नका, आमच्यात फाटलंय, पुन्हा एकत्र येणारच नाही, अजित पवार यांचे परखड बोल

Ajit Pawar: पक्ष प्रवेशसाठी आज तारीख दिली होती. त्यात आज माजी तब्बेत ठीक नाही. त्यामुळे रोजच्या सारखा माझा आवाज नसणार आहे. आज मंचरला अजून एक सभा आहे. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. कामाचा ताण जास्त आहे.

शंका ठेऊ नका, आमच्यात फाटलंय, पुन्हा एकत्र येणारच नाही, अजित पवार यांचे परखड बोल
ajit pawar
| Updated on: Mar 04, 2024 | 1:27 PM
Share

सुनील थिगळे, मांडवगण फराटा, शिरूर, पुणे | दि. 4 मार्च 2024 : घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं. मी त्यांना तसं आवाहन करतोय. त्यांनी सांगावं आपण नवी बॉडी आणू. वाटलं तर प्रशासक आणू. कारखाना चांगला चालायला हवा, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये. तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. फक्त तुम्ही साथ द्या. आत्ताचा आमदार असं वेड वाकडं वागेल असं वाटलं नव्हतं. आपला वेगळी वाट आहे त्यांची वेगळा वाट आहे. आज ही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका, असे स्पष्ट बोल अजित पवार यांनी काढले. यावेळी त्यांनी शिरुरचे आमदार अशोक बापू पवार यांचे नाव न घेता टीका केली.

अशोक पवार यांना घेरले

शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवार यांनी घोडगंगा कारखान्यावर मुलाला चेअरमन केले. मी आमदारांना म्हटलं तो नवखा आहे. पण आमदार काय ऐकायला तयार नाही. पुढं काय झालं, कारखाना बंद पडायची अवस्था निर्माण झाली. मी बँकेला नवखा होतो. परंतु फक्त मला संस्था कशी चालवायची हे चांगलेच माहीत होते. काळ बदलत गेला आम्ही देखील राजकारणामध्ये आलो. त्याच्यातला संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न केला. आपली जिल्हा परिषद असेल, आपला दूध संघ असेल चांगल्या चालवला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी कालपर्यंत संचालक होतो. परंतु अलीकडे व्यापामुळे राजीनामा दिला. सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील आहेत आणि त्यातून शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.

आचार संहिता लागणार

पक्ष प्रवेशसाठी आज तारीख दिली होती. त्यात आज माजी तब्बेत ठीक नाही. त्यामुळे रोजच्या सारखा माझा आवाज नसणार आहे. आज मंचरला अजून एक सभा आहे. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. कामाचा ताण जास्त आहे. पोलिसांच्या भरती मोठ्या प्रमाणात करणार आहोत. आमचे तीन पक्षांचे सरकार आहे. मला पालकमंत्री असल्यामुळे सर्वांना मदत करावी लागते. आता येत्या आठवड्यात आचार संहिता लागेल. त्यामुळे कामांना मर्यादा येईल.

शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढणार

शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत त्या जाणून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न माझा सुरू असतो. प्रत्येक वेळी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. आपला नदीच्या कडेचा पट्टा आहे. कशा पद्धतीने आपला ऊस जाताना आपल्याला त्रास व्हायचा. कशाप्रकारे बाकीचे येऊन त्रास द्यायचे, याच्या आठवणी अजित पवार यांनी सांगितल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आता माझी चांगली ओळख झालेली आहे. मी त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवत आहे. लवकरच साडे आठ लाख पंप सोलरवर चालणारे शेतकऱ्यांना देणार आहोत. सोलर पॅनलची योजना महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेली आहे.त्यामुळेच वीज बचत होणार आहे. शेतकाऱ्यांचा खर्च कमी होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.