Omicron | कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण; आरोग्य विभागाचं टेन्शन वाढलं

पिंपरीतील सहापैकी तिघे जण 18 वर्षाखालील असून अन्य तिघांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशील्ड तर एकाने कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण होत असल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन आता आणखी वाढले आहे.

Omicron | कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण; आरोग्य विभागाचं टेन्शन वाढलं
कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण

पिंपरी-चिंचवड : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. काल कल्याण-डोंबिवलीत एकाला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी जणांना 6 तर पुण्याला एकाला ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे पिंपरीतील सहापैकी तिघे जण 18 वर्षाखालील असून अन्य तिघांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशील्ड तर एकाने कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण होत असल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन आता आणखी वाढले आहे.

नायजेरिया देशातील लेगॉस शहरातील एक 44 वर्षीय महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी आपल्या 12 व 18 वर्षांच्या दोन मुलींसह पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. या तिघींच्या संपर्कात आल्याने महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड वर्ष आणि 7 वर्षाच्या दोन मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे. या सहा जणांच्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचा आढळल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज सायंकाळी दिला. नायजेरियाहून आलेल्या महिलेमध्ये सौम्य लक्षणे असून अन्य पाच जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या ट्रास्क फोर्सची दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ज्ञांसोबत उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे.

पुण्यात एकाला ओमिक्रॉनची लागण

पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषाला या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर 2021 या काळात फिनलंड येथे गेला होता. तेथून आल्यानंतर 29 नोव्हेंबरला त्याला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळला. त्याने कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्याला कोणतीही लक्षणे नसून त्याची प्रकृती स्थिर आहे.

आरोग्य विभागाचे आवाहन

राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 30 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत, त्यांनी आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Omicron infection even after taking both covaxin and covshield doses)

संबंधित बातम्या

Omicron Update |पुण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव : जिल्ह्यासह ,पालिका प्रशासन अर्लट ; परदेशातून परतलेल्या 267 नागरिकांची RT-PCR निगेटिव्ह

पुण्यात 1 पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनबाधित, लस घ्या अन् कोरोना नियम लाळा; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

Published On - 8:00 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI