संतोष देशमुख प्रकरणावर प्रश्न विचारताच पंकजा मुंडे संतापल्या? पुण्यात आहे, पुण्यातील प्रश्न विचारा?
मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात. पुण्यातले प्रश्न विचारा. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी १५०० पानांचे दोषारोपत्र दाखल केले आहे. त्यावर प्रश्न विचारल्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे संतापल्या. त्यात काय लिहिले तुम्ही वाचेल का? दोषारोपपत्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कन्टेट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी पुण्यात आहे. पुण्याचे प्रश्न विचारा, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
तो विषय गृहखात्याचा
पुण्यात माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही. हे सगळे गृह खात्याकडे असते. त्यांना माहिती असेल. संतोष देशमुख यांच्या हत्येता मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही.
माझ्याकडे गृहखाते नाही. गृहखाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत. दोषींवर नक्की कारवाई होईल. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जलदगतीने चौकशी झाली पाहिजे. आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात. पुण्यातले प्रश्न विचारा. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर टीका सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य ऐकून धक्का बसला. त्या म्हणतात मी पुण्यात आलीये तर इथले प्रश्न विचारा? बीडवर नको. तुम्ही बीडच्या आहात. परळीमध्ये आहात. मग तुम्हालाच तेथील प्रश्न विचारणार ना? तुम्ही अमेरिकेत गेलात तर आम्ही तुम्हाला ट्रम्पवर विचारायचे का? असा टोला दमानिया यांनी लगावला.
