लोकांनी एसटीमध्ये कचरा केला, मग या महिलेने जे केले त्याचा व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

st viral video : परभणीमधील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला हातात झाडू घेऊन स्वच्छता करत आहे. विशेष म्हणजे तिची ही जबाबदारी नसताना तिने हे काम केले आहे.

लोकांनी एसटीमध्ये कचरा केला, मग या महिलेने जे केले त्याचा व्हिडिओ झाला तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 4:31 PM

नजीर खान ,परभणी : गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळ काम करत आहेत. एसटीतील कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यानंतर थोडी पगारवाढ करुन कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा निघाला. परंतु अजूनही एससटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. त्यांना इतर कामेही करावे लागतात. आता एसटीमधील महिला कंडाक्टचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर एसटीतील कर्मचाऱ्यांना कोण-कोणती कामे करावे लागतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून एसटी प्रशासनाचे अपयश समोर येत आहे.

काय आहे व्हिडओमध्ये

हे सुद्धा वाचा

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये एक महिला वाहक दिसत आहे. त्या महिलेच्या एसटीत प्रवाशांनी खूप कचराही केला आहे. मग या महिलेने जसे आपले घर स्वच्छ ठेवते, तशी एसटी स्वच्छ केली. मग हे आपले काम नाही, असा विचार तिने केला नाही. बस निघण्यापूर्वी बसलेल्या प्रवाशांसमोर एसटी स्वच्छ केली. एसटीमध्ये झाडू मारतानांचा तिचा हा व्हिडिओ राज्यभर तुफान व्हायरल होतोय.

स्वच्छता कर्मचारी गेले कुठे

या व्हिडिओनंतर एसटी महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी कुठे गेले ? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी आपल्या कामांमध्ये हलगर्जीपणा करत असल्याचे यामाध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे बसमध्ये कचरा साचल्याने महिला वाहक महानंदा केंद्रे यांनी स्वतः झाडू हातात घेत बसची सफाई केली.

प्रवाशाने काढला व्हिडिओ

वाहक महानंदा केंद्रे बसमध्ये झाडू काढत असतानाचा व्हिडिओ प्रवास करत असलेल्या एका प्रवाशांने काढला. त्याने संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ आता परभणी जिल्ह्यात नाही तर राज्यभर चांगलाच व्हायरल होतोय. एकूणच राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.