पुण्यात ऑगस्ट महिन्यात पेट्रोल 31 तर डिझेल 96 पैशांनी स्वस्त, सीएनजी मात्र, 90 पैशांनी वाढलं!

एकीकडे रुपयांमध्ये इंधनाच्या किंमती वाढत असताना सर्वसामान्यांना पैशांमध्ये दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. कारण ऑगस्ट महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे 31 तर 96 पैशांनी कमी झाल्या आहेत.

पुण्यात ऑगस्ट महिन्यात पेट्रोल 31 तर डिझेल 96 पैशांनी स्वस्त, सीएनजी मात्र, 90 पैशांनी वाढलं!
पेट्रोल-डिझेल दर

पुणे : इंधन दरवाढीने (Fuel Prices) सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढला आहे. मागच्या तीन ते चार महिन्यात ठराविक अंतराने देशातले पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) भाव सातत्यानं वाढत गेले. पुण्यात पेट्रोलनं पहिल्यांदा शंभरी पार केली. एकीकडे रुपयांमध्ये इंधनाच्या किंमती वाढत असताना सर्वसामान्यांना पैशांमध्ये दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. कारण ऑगस्ट महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे 31 तर 96 पैशांनी कमी झाल्या आहेत. (Petrol and diesel prices in Pune have declined by a few paise in August)

सीएनजीचे दर वाढले

पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत्या किंमतींमुळे अनेक वाहनचालक सीएनजीला (CNG) प्राधान्य देताना दिसत आहेत. पण ऑगस्ट महिन्यात सीएनजीचे दर 90 पैशांनी वाढले आहेत. 2 ऑगस्टला सीएनजीचे दर वाढले होते. त्यानंतर मात्र, दर स्थिर आहेत.

24 ऑगस्टनंतर इंधनादरांत बदल नाही

17 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान एकदाही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. याऊलट याकाळात चार वेळा डिझेलच्या दरात काही पैशांची कपात झाली होती. त्यानंतर दर स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार पहायला मिळाला आहे. पण 24 ऑगस्टनंतर इंधनाच्या दरांमध्ये कसलेही बदल झालेले नाहीत.

एका वर्षात ई-स्कूटरची संख्या 45 टक्क्यांनी वाढली

एकीकडे वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आणि कोरोनाच्या कारणामुळे वाहनांच्या विक्रीची संख्या घटली असली तरी दुसरीकडे इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे नागरिकांचा ओढा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ई स्कूटरसारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. एका वर्षात ई-स्कूटरची संख्या तब्बल 45 टक्क्यांनी वाढली आहे. शहरात आतापर्यंत 42 हजार 215 सीएनजी आणि एलपीजी वाहनांच्या नोंदी झाल्या आहेत. यामध्ये नऊ हजार 715 चारचाकी आणि दोन हजार 148 तीनचाकी वाहनाचा समावेश आहे. यापैकी 11 हजार 903 वाहनं गेल्यावर्षी वाढली आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

(Petrol and diesel prices in Pune have declined by a few paise in August)

इतर बातम्या :

Tesla च्या चार इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात मंजुरी, लवकरच लाँचिंग

Vastu Upay | आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर घरात ही चित्रे लावा, घरात भरभराट होईल

PHOTO: फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना ‘या’ चार गोष्टी नक्की ध्यानात ठेवा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI