Vastu Upay | आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर घरात ही चित्रे लावा, घरात भरभराट होईल

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. वास्तू दोषांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. यामुळे तुमची सुरळीत सुरु असलेली कामंही बिघडू लागतात. व्यवसायात पैशांशी संबंधित समस्या येतात. जर तुमच्या घरात वास्तुदोषाची समस्या असेल तर वास्तुशास्त्रात त्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत.

Vastu Upay | आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर घरात ही चित्रे लावा, घरात भरभराट होईल
Vastu_Tips

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. वास्तू दोषांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. यामुळे तुमची सुरळीत सुरु असलेली कामंही बिघडू लागतात. व्यवसायात पैशांशी संबंधित समस्या येतात. जर तुमच्या घरात वास्तुदोषाची समस्या असेल तर वास्तुशास्त्रात त्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत.

हे उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. वास्तुशास्त्रानुसार, घरात काही चित्रे लावल्याने मनाला शांती मिळते. तसेच, घरात सुख-समृद्धी येते. घरात भरभराट होते. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारची चित्रे लावली पाहिजेत जाणून घ्या –

आर्थिक लाभ होण्यासाठी

जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर घरात देवी लक्ष्मी आणि धर्म दाता कुबेर यांचे चित्र लावा. ही चित्रे नेहमी उत्तर दिशेला लावा. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा धनप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होतो.

सुंदर चित्रे

सुंदर चित्रे प्रत्येकाला आवडतात. घराची सुंदरता वाढवण्याबरोबरच ही चित्रे वास्तु दोष दूर करण्यास देखील मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार सुंदर चित्रे लावल्याने संपत्तीत वाढ होते. घराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेच्या भिंतींवर नेहमी निसर्गाशी संबंधित सुंदर चित्रे लावावी.

बाळाची चित्रे

घरात हसणाऱ्या बाळाचे चित्र लावल्याने नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुशास्त्रानुसार, अशी चित्रे पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे अत्यंत शुभ आहे. बाळाचे चित्र पाहून तुमचा मानसिक ताण कमी होतो.

नदी आणि धबधब्यांचे फोटो

घराची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नद्या आणि धबधब्यांची चित्रे ईशान्य दिशेला लावावी. जर तुम्ही घरात पूजा घर बनवले असेल, तर नियमितपणे पूजा करावी. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण आणि पश्चिम दिशेने बांधलेल्या खोलीचा वापर पूजेसाठी करु नये.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Mirror Vastu Rules : आरशाशी संबंधित हे उपाय केल्यास आरशासारखे चमकेल भाग्य

Peepal Puja Remedies : पिंपळाची पूजा करण्याचा उत्तम उपाय, जो पूर्ण होताच सर्व इच्छा होतात पूर्ण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI