AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nude photography exhibition| पुण्यात न्यूड फोटोग्राफी प्रदर्शन भरवले म्हणून छायाचित्रकाराला धमकी ; प्रदर्शन तात्काळ बंद अन्यथा……

छायाचित्रकार अक्षय माळी हा छायाचित्रकार आहे. त्यानं पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफीमधून आपले शिक्षण घेतले आहे. न्यूड फोटोग्राफि बदलाचा दृष्टिकोन बदलवा या संकल्पनेतून त्याने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात तीन दिवसाचे न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले.

Nude photography exhibition| पुण्यात न्यूड फोटोग्राफी प्रदर्शन भरवले म्हणून छायाचित्रकाराला धमकी ; प्रदर्शन तात्काळ बंद अन्यथा......
Nude Photography
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 3:38 PM
Share

पुणे – शहरतील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने छायाचित्रकाराला धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकंच नव्हे तर बालगंधर्व व्यवस्थापनानेही त्याचे प्रदर्शन तातडीने बंद केले आहे. कोणाच्यातरी दबावाखाली येत नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यास बंद केल्याचा आरोप छायाचित्रकार अक्षय माळी याने केला आहे.

नेमकं काय घडलं

छायाचित्रकार अक्षय माळी हा छायाचित्रकार आहे. त्यानं पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफीमधून आपले शिक्षण घेतले आहे. न्यूड फोटोग्राफि बदलाचा दृष्टिकोन बदलवा या संकल्पनेतून त्याने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात तीन दिवसाचे न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले. 7 जानेवारीला प्रदर्शन सुरु झाले. पाहिल्याच दिवशी अज्ञात नंबरवरून मला फोन आला. ”हे असलं प्रदर्शन दोन मिनिटात बंद करा, अन्यथा आंदोलन केले जाईल” अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर बालगंधर्व व्यवस्थापनानेसुद्धा दुसऱ्या दिवशी पासून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास सोडले नाही. अशी माहिती अक्षय यांनी लोकमत या वृत्तपात्राला दिली आहे.

प्रदर्शनातील चित्रे पाहू नये म्हणून चित्रे उलटी केली

न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्यानंतर ते 8,9  असे तीन दिवस सुरु राहणार होते. पण पहिल्याच दिवशी एका फोन आल्याने बालगंधर्व व्यवस्थापनानेसुद्धा दुसऱ्या दिवशीपासून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास सोडले नाही.प्रदर्शनात लावण्यात आलेली चित्रे उलटी करून ठेवण्यात आली आहेत. नागरिक प्रदर्शन पाहायला आले तर हास्यास्पद दिसत आहे. मी याबद्दल कुठेही तक्रार करणार नाही. आज शेवटचा दिवस थांबून सायंकाळी प्रदर्शन काढणार असल्याचे अक्षयने यावेळी सांगितले आहे.

ही माझी कला

न्यूड फोटोग्राफीबद्दल माझ्या मनात ज्या नवे विचार, कल्पना येतात. त्या मी फोटोग्राफीसारख्या कलेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी कितीही टीका केली अथवा धमकी दिली तरी माझी कला बंद करणार नाही. आणि धमक्यांना उत्तरे द्यायला माझ्याकडे वेळ नाही असेही तो यावेळी म्हणाला आहे.

Kumbha Kalpwas 2022 | जाणून घ्या प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मिनी कुंभचे धार्मिक महत्त्व आणि नियम

इतर तरुणांची नजर आपल्या प्रेयसीवर पडू नये म्हणून त्याने चक्क तिचे दोन दात तोडले

साखर कारखान्यांच्या माध्यमातूनच ऊसतोड कामगारांचे हीत, समाजकल्याण विभागाचा काय आहे निर्णय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.