पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा; मोशी -चांडोली टोलनाक्यावरची वसुली बंद

Toll Plaza | 8 ऑक्टोबर 2021 रोजी मोशी-चांडोली टोलनाक्याची मुदत पूर्ण झाली आहे. हा टोलनाका बंद झाल्याने मोशी -चांडोली नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी थोडी फार कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा; मोशी -चांडोली टोलनाक्यावरची वसुली बंद
टोलनाका
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 8:45 AM

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा नाशिक रोडवरील मोशी -चांडोली टोल नाका आयआरबी कंपनीने आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकराना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक रोडवरील मोशी-चांडोली टोल नाक्याचे रस्ता बांधणीचे पुर्ण पैसे वसूल झाल्याने आयआरबीने टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेतला.

8 ऑक्टोबर 2021 रोजी मोशी-चांडोली टोलनाक्याची मुदत पूर्ण झाली आहे. हा टोलनाका बंद झाल्याने मोशी -चांडोली नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी थोडी फार कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर धुक्याची चादर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर सध्या धुक्याची चादर अंथरलेली पाहायला मिळत आहे. गेली काही दिवस ऊन-पावसाचा खेळ अनुभवल्यानंतर प्रवाशांनी पहिल्यांदाच गारवा अनुभवला. सह्याद्रीच्या पर्वत रांगा मधील मावळ आणि त्यामधील धुकं यामुळे निसर्ग आणखी भरून गेला आहे. हे वातावरण आल्हाददायक असलं तरी धुक्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

तीन वर्षात भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते: गडकरी

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा केली होती. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला दोन किलोमीटर इतका होता.

भारताने यावर्षी 20 मार्चपर्यंत 1,37,625 किलोमीटरपर्यंत महामार्गांचे बांधकाम केले आहे. एप्रिल 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर महामार्गांचे बांधकाम करण्यात आले होते. या कालावधीत भारताने महामार्गांच्या बांधकामासाठी पाचपट जास्त पैसे खर्च केले आहेत. गेल्या सात वर्षात भारताने राष्ट्रीय महामार्गाची लांबी 50 टक्क्यांनी वाढवल्याचा दावाही गडकरी यांनी केला होता.

इतर बातम्या:

अजित पवारांना शरद पवारांनी उभे केले, उपमुख्यमंत्र्यांचा जीवनपट सांगताना मातोश्रींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

गुटखा खाऊ नका, दारूपासून दूर राहा, नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा; अजितदादांनी तळीरामांना फटकारलं

साडेतीन कोटींचा चरस-गांजा, नेपाळी प्रवासी आणि पुणे ग्रामीण पोलीस, मुंबई-गोवा हायवेवर धरपकड, गुन्ह्यात पाकिस्तानचंही कनेक्शन?

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.