AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपयुक्त साधन घेण्यासाठी दिव्यांगांना अर्थसहाय्य, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर

दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांगांना उपयुक्त साधन घेण्यासाठी महापालिकेकडून अर्थसहाय्य केलं जातं. यासाठी दिव्यांगांना काही अटींची पूर्तता करून आपली कागदपत्र महापालिकेला सादर करायची आहेत.

उपयुक्त साधन घेण्यासाठी दिव्यांगांना अर्थसहाय्य, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 6:14 PM
Share

पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगी अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यासोबतच वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबवत असतात. (Pimpri Chinchwad Municipal Corporation provides financial assistance to the disabled people for the purchase of useful tools)

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आपल्या हद्दीतल्या नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला, मुली, मागासवर्गीय, एचआयव्हीबाधित, कुष्ठपिडित आदींसाठी शिक्षण, घर, शस्त्रक्रिया, पुनर्वसन आणि इतर बाबींसाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहय्य केलं जातं. अशा विविध योजनांची आपण ओळख करून घेणार आहोत.

दिव्यांग कल्याणकारी योजना

दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत राहणाऱ्या दिव्यांगांना उपयुक्त साधन घेण्यासाठी महापालिकेकडून अर्थसहाय्य केलं जातं. यासाठी दिव्यांगांना काही अटींची पूर्तता करून आपली कागदपत्र महापालिकेला सादर करायची आहेत.

कोणती कागदपत्रं लागणार?

यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, जातीचा दाखला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अपंगत्वाचा प्रकार आणि अपंग प्रमाणपत्राचा क्रमांक द्यायचा आहे. यासोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचा तपशिलही द्यायचा आहे. यासोबत अर्जात भरली जाणारी सर्व माहिती खरी आहे हे सांगण्यासाठी एक स्वयंघोषणापत्रही अर्जदाराला सोबत जोडायचं आहे.

या अर्जासोबत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशी असल्याचं आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचं शासकीय, मनपा रुग्णालयाचं प्रमाणपत्र सोबत द्यायचं आहे. महापालिका प्रशासनाने अर्ज पात्र ठरवल्यानंतर त्याबाबत अर्जदाराला माहिती कळवली जाईल. त्यानंतर साधन खरेदी केल्याची Active GST नंबर असलेली पक्की पावती सादर करायची आहे.

काय आहेत योजनेच्या अटी

अर्जदार हा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतला रहिवाशी असावा ही पहिली अट या योजनेच्या पात्रतेसाठी आहे. यासोबतच दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अर्जदाराने या कारणासाठी इतर कोणत्या शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा, अशा या योजनेच्या अटी आहेत.

अटींची पूर्तता झाल्यास सर्व कागदपत्रं जमा केल्यानंतर साधन खरेदीच्या पावतीतील रक्कम किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

कसा आणि कुठे करणार अर्ज?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, नागरवस्ती विकास योजना, महापालिका, पिंपरी चिंचवड यांच्याकडे लेखी अर्ज करायचा आहे. या अर्जाचा नमुना महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईट किंवा महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या कार्यालयात भेट द्या.

(Pimpri Chinchwad Municipal Corporation provides financial assistance to the disabled people for the purchase of useful tools)

इतर बातम्या :

PMRDA विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी अखेर मुदतवाढ! आता या तारखेपर्यंत नोंदवा हरकती

‘मॅग्नेट’सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा देणार, अजितदादांची ग्वाही

‘काही जित्राबं लय वाईट असतात’, अजित पवारांच्या सडेतोडपणाचे 8 पुरावे, वाचा सविस्तर

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.