भांडणाच्या सूडापोटी मित्राची दुचाकी पेटवली, चिंचवडमध्ये दहा गाड्या जळून खाक

पिंपरी चिंचवडमध्ये पैशांच्या देवाणघेवणीवरुन झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी एका मित्राने दुसऱ्याची गाडी पेटवली. (Pimpri Chinchwad Vehicle fire)

भांडणाच्या सूडापोटी मित्राची दुचाकी पेटवली, चिंचवडमध्ये दहा गाड्या जळून खाक

पिंपरी चिंचवड : वाहन तोडफोडीच्या सत्रानंतर आता पिंपरी चिंचवड परिसरात गाड्या पेटवण्याची घटना समोर आली आहे. मित्रांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या वादातून दुचाकी पेटवण्यात आली. एका गाडीला लावलेली आग पसरुन दहा गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Pimpri Chinchwad Vehicle Set on fire)

पिंपरी चिंचवडमध्ये दोन मित्रांमध्ये पैशांच्या देवाणघेवणीवरुन वाद झाला होता. याचा सूड घेण्यासाठी एका मित्राने दुसऱ्याची गाडी पेटवली. या घटनेत भडका उडाला आणि आगीने रौद्ररुप धारण केले. यामध्ये शेजारच्या वाहनांचेही नुकसान झाले.

जाळपोळीच्या घटनेत एकूण दहा वाहनं जळून खाक झाली आहेत. गाडी पेटवत असतानाची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

सुरक्षारक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सुरक्षारक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. भगवान वायफळकर हे एस व्ही एन्टरप्रायजेस या रिक्षाचे पार्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या कंपनीसमोर वायफळकर यांच्या मालकाची बीएमडब्लू कार पार्क केली होती. महेंद्र बाळू कदम हा 31 वर्षीय रिक्षाचालक मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गाडीजवळ लघुशंका करत असताना वायफळकरांना दिसला.

आरोपी महेंद्र कदमला वायफळकर यांनी अडवले आणि जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने वायफळकर यांच्या अंगावर आपल्याजवळ असलेल्या बाटलीतील पेट्रोल टाकले. त्यानंतर स्वतःजवळ असलेल्या लायटरने त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. वायफळकरांना पेटवल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

संबंधित बातम्या :

BMW जवळ लघुशंका करताना हटकल्याचा राग, पिंपरीत रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकाला पेटवले

सुपर बाईकची धूम ठरली अखेरची, राईड दरम्यान अपघात होऊन तरुणाचा दुर्दैवी अंत

(Pimpri Chinchwad Vehicle Set on fire)

Published On - 9:27 am, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI