Pune PMC | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार ; पण 11  गावांच्या विकासाचा मुहूर्त कधी साधणार?

Pune PMC | पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार ; पण 11  गावांच्या विकासाचा मुहूर्त कधी साधणार?
PMC
Image Credit source: TV9

गेल्या तीन वर्षापासून महापालिकेत समावेश होवूनही या गावांचा विकास थांबला आहे. मात्र दुसरीकडं अवघ्या पाच महिन्यांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्याला गती मिळाली आहे. ही गावे 23 गावे पालिकेत आली असली तरी त्याच्या विकास आराखड्याचे काम पीएमआरडीएकडून सुरू असल्याने शासनाने हे काम त्यांच्याकडेच ठेवले होते.

प्राजक्ता ढेकळे

|

Mar 18, 2022 | 8:30 AM

पुणे – पुणे महापालिकेत(Pune Municipal Corporation)  नव्याने समावेश झालेल्या 23 गावांचा आराखडा तयार झाला आहे. त्यावर सुनावणी सुरु आहे. मात्र 2017  मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा(Development plan) अद्यापही पूर्ण झाला नसल्याचे समोर आले आहे. या 11  गावांच्या विकासाला मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका (Election)लक्षात घेत नव्याने सामाविष्ट झालेल्या 23 गावांना विकासकामे सुरु न झाल्याचं कारण देत कर सवलत ही नुकतीच देण्यात आली आहे. त्यानंतर आता गावांच्या नियोजनात्मक विकास सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेट समाविष्ट झालेल्या 11 विकासाचा मुहूर्त कधी साधणार याकडे लक्ष लागले आहे.

या गावांचा समावेश

महानगरपालिकेच्या हद्दीत २०१७मध्ये ११ गावांचा समावेश झाला. यामध्ये लोहगाव (उर्वरित), उर्वरित हडपसर- साडेसतरा नळी, मुंढवा, केशवनगर, उंड्री, आंबेगाव खुर्द, बुद्रुक, शिवणे, शिवणे-उत्तमनगर, धायरी (काही भाग), उरुळी देवाची आणि फुरसुंगी पूर्ण या गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर जवळपास वर्षभराने पुणे महापालिकेने ऑक्‍टोबर 2018 मध्ये या गावांसाठी विकास आराखडा जाहीर करण्याचा मानस व्यक्त केला. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे विकास आराखड्याचे काम बारगळले ते आद्यपही सुरु झालेले नाही. सद्यस्थितीला महापालिकेने आराखड्याच्या कामासाठी 22 जून 2022 पर्यंतची मुदत दिली आहे

आराखडा वेगाने मार्गी लागला

गेल्या तीन वर्षापासून महापालिकेत समावेश होवूनही या गावांचा विकास थांबला आहे. मात्र दुसरीकडं अवघ्या पाच महिन्यांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्याला गती मिळाली आहे. ही गावे 23 गावे पालिकेत आली असली तरी त्याच्या विकास आराखड्याचे काम पीएमआरडीएकडून सुरू असल्याने शासनाने हे काम त्यांच्याकडेच ठेवले होते. त्यामुळे, हा आराखडा वेगाने मार्गी लागला असून आता त्यावर हरकती आणि सूचनांची सुनावणी सुरू झाली आहे. वर्षभरात तो मान्यही केला जाईल. त्यामुळे 11 गावांच्या आधी 23 गावांचा आराखडा मार्गी लागेल असे चित्र स्पष्ट झाले आहे.

Punjab चे मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करणार, तारीख ठरली

TRP: कशी ठरविली जाते टीव्ही न्यूज चॅनल्सची रेटिंग, BARC म्हणजे नेमके काय? टीआरपी मोजण्यासाठी कोणत्या तांत्रिक पद्धतीचा केला जातो वापर?

Holi Celebration | होळीनिमित्त Nandurbarमध्ये साखरेच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें