Pune : …म्हणून पावसाचं गढूळ पाणी घरात घुसतंय; काय कारणं आहेत? पुणेकरांनो, वाचा ही बातमी…

नाल्याच्या झाकणांना असणाऱ्या जाळ्यांची छिद्रे बुजली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सिमेंटची झाकणे काढावी लागली. बहुतेक प्लास्टिकचा कचरा जुना बाजार, जनता वसाहत, रामटेकडी भागात आणि बाबा भिडे पुलाजवळील मुठा नदीत रस्त्यावर पडल्याचे दिसते.

Pune : ...म्हणून पावसाचं गढूळ पाणी घरात घुसतंय; काय कारणं आहेत? पुणेकरांनो, वाचा ही बातमी...
नदीकाठी अशाप्रकारे बेजबाबदारपणे टाकला जाणारा कचराImage Credit source: punemirror
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 8:30 AM

पुणे : पुण्यातील पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी झालेल्या पावसाने पुणेकरांची गैरसोय झाली होती. अनेकांच्या घरात पाणी घुसले होते. धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीत केल्याने मुठा नदीदेखील (Mutha river) भरून वाहत होती. यात एक गोष्ट पुढे आली ती म्हणजे, या पूरसदृश्य स्थितीला नागरिकही जबाबदार आहेत, हे दिसून आले. पाण्याचा निचरा होत असताना निष्काळजीपणे फेकून दिलेले डिस्पोजेबल (Disposable) चहाचे कप, एकवेळा वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्या, गुटखा-पान मसाल्याची पाकिटे, बिस्कीटचे रॅपर, चिप्सचे पाऊच आणि इतर कचरा कचरापेटीत टाकण्याऐवजी रस्त्यावर आणि पाण्यात टाकल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. जेव्हा पावसाचे पाणी (Rain water) हे घाण वाहून नेते त्यावेळी सर्वत्र ब्लॉक झाल्याने मोठ्या प्रमाणात हे पाणी साचते.

जलवाहिन्यांमध्ये गाळ

शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 1,700 टन घनकचऱ्यापैकी 180 टन प्लास्टिक कचरा आहे. पुणे महापालिकेने कमीत कमी 200 मटेरियल रिकव्हरी सेंटर्स उघडली आहेत. या आठवड्यात शहरात अनेक दिवस पडलेल्या पावसात शहरातील एकही रस्ता पाणी साचण्यापासून राहिला नाही. रस्त्यांवरील जलवाहिन्यांमध्ये खूप गाळ होता. नाल्याच्या झाकणांना असणाऱ्या जाळ्यांची छिद्रे बुजली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सिमेंटची झाकणे काढावी लागली. बहुतेक प्लास्टिकचा कचरा जुना बाजार, जनता वसाहत, रामटेकडी भागात आणि बाबा भिडे पुलाजवळील मुठा नदीत रस्त्यावर पडला आहे, असे पाहणीत आढळले.

हे सुद्धा वाचा

प्लॅस्टिकमुळे अनेक समस्यांना द्यावे लागत आहे तोंड

पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी बाहेर पडण्यासाठी जेव्हा आम्ही नाल्यांचे झाकण काढतो तेव्हा आम्हाला नाल्यात प्लास्टिकच्या पिशव्या, कागदी कप आणि थर्माकोलचे तुकडे आढळतात. शहरातील कचऱ्याचा एक मोठा भाग या नाल्यातून बाहेर पडतो. नाल्यांचे पाणी पावसाच्या पाण्यामध्ये मिसळते आणि आपल्या घरात घुसते. आपल्याला कावीळ, अतिसार, टायफॉइड आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला तातडीच्या उपाययोजना कराव्या लागतात, असे पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.