मोदी ते तेंडुलकर, राज ते राज्यपाल, ‘शतकवीर’ बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसाला दिग्गजांची उपस्थिती लावणार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी (Pm Modi) ते भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) ते राज्यपाल कोश्यारींसह (BhagatSinh Koshyari) दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत.

मोदी ते तेंडुलकर, राज ते राज्यपाल, 'शतकवीर' बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसाला दिग्गजांची उपस्थिती लावणार
बाबासाहेब पुरंदरे आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 9:46 AM

पुणे :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी (Pm Modi) ते भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) ते राज्यपाल कोश्यारींसह (BhagatSinh Koshyari) दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘शतकवीर’ बाबासाहेब पुरंदरे!

आज 13 ऑगस्टला बाबासाहेब पुरंदरे तिथीप्रमाणे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे मोदी पुरंदरेंना ऑनलाईन शुभेच्छा देणार आहेत.

पुरंदरेंच्या वाढदिवसाला कुणाकुणाची उपस्थिती?

पंतप्रधान मोदींबरोबर, सरसंघचालक मोहन भागवत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होतील.

तर उद्या म्हणजेच 14 ऑगस्टला ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल. 15 ऑगस्टला राज्यपाल भगतसिंग कोशारी शिवसृष्टीला भेट देणार आहे. यावेळी पुरंदरेंना ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील, अशी माहिती सत्कार समारोह समितीचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काहीच दिवसांपूर्वी पुण्यात पुरंदरेंच्या वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तारखेप्रमाणे 29 जुलैला शंभराव्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला.

पुरंदरे- ठाकरे कुटुंबांचं जुनं नातं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे घराण्याचं नातं हे गेल्या काही दशकापासूनचं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष जिव्हाळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अनेक व्याख्यानांना बाळासाहेब ठाकरे हजेरी लावायचे. त्यांच्या बरोबर ते राज ठाकरे यांना देखील घेऊन जायचे. बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या पुण्या-मुंबईत भेटीही व्हायच्या. यावेळीही राज ठाकरे सोबत असायचे. एकंदरित बाबासाहेबांचं व्यक्तीमत्व राज ठाकरे यांना विशेष भावतं. राज ठाकरेंनी बाबासाहेबांची रायगडावर विशेष मुलाखत घेतली होती.

बाबासाहेब-राज यांचा जिव्हाळा

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असले आणि वेळ असला की ते आवर्जून बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जात असतात. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाला होता त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी पुरंदरेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आजही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांनी बाबासाहेबांना शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले.

(PM Narendra Modi Sachin tendulkar will attend Babasaheb Purandare’s birthday through video conferencing)

हे ही वाचा :

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून पायावर डोकं ठेवून नमस्कार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.