सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय?; प्रकाश महाजन यांच्याकडून एकेरी उल्लेख, खालच्या पातळीवर टीका

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवादी राजकारण सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय?; प्रकाश महाजन यांच्याकडून एकेरी उल्लेख, खालच्या पातळीवर टीका
सुषमा अंधारे यांच्या मेंदूला नारू झालाय काय?; प्रकाश महाजन यांच्याकडून एकेरी उल्लेखImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 11:53 AM

पुणे: मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. इतकच नाही तर मीडियाशी संवाद साधताना महाजन यांनी सुषमा अंधारे यांचा एकेरी उल्लेखही केला आहे. सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? असा संतप्त सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी कालच्या मुलुंड येथील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर महाजन बोलत होते.

सुषमा अंधारेंची सभा कालच झाली. या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. काय बोलली ती?असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.

हे सुद्धा वाचा

कालच तिची सभा झाली.. इतके वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीचा मजला चढला नाही. पण कृष्णकुंजचा मजला चढला, असं ती म्हणाली. हे बोलण्याआधी तिने आपल्या मालकाला विचारायला हवं ना. मी असं बोलू की नको हे विचारलं पाहिजे ना? असा सवालही त्यांनी केला.

सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरं जावं लागणार आहे, अशी टीका करतानाच काल परवा मुसलमान झाल्यासारखं सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरतायत, असा हल्लाही त्यांनी चढवला. मातोश्री-2 कशी झाली ते सांगावं? उद्धव ठाकरेंना सवाल करावा, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांना पुत्रमोह आडवा येतोय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावरही त्यांनी टीका केली. सुषमा अंधारेना पुत्रमोह होऊ शकत नाही, कारण त्यांची वेगळी अडचण आहे, असं महाजन म्हणाले.

तुमचे नेते पहाटेच भाजपच्या पाणवठ्यावर गेले होते, त्यांनाच विचारा असा टोला त्यांनी रुपाली पाटलांना एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवादी राजकारण सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे यांचे आरोप हस्यास्पद आहेत. त्यात तसूभरही तथ्य नाही. नखभरही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवार यांच्या या विधानावरही महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुम्ही जातीयवादी नाही तर राष्ट्रवादीने सप्रमाण दाखवून द्यावं. त्यांच्या पक्षात विशिष्ट जातीची लोकं आहेत. त्यांचंच वर्चस्व आहे. हे दिसून येतं. हातच्या कंगनाला आरसा कशाला पाहिजे? असं महाजन म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.