Pune News : आजीने औषधासाठी 500 रुपये दिले, ते पैसे घेऊन दोन अल्पवयीन मुली निघाल्या दक्षिण कोरियाला, पुढे काय झाले…

Pune News : पुणे शहरात दोन अल्पवयीन मुलींनी केलेल्या प्रकारामुळे पालक चिंतेत आले होते. त्या मुली दक्षिण कोरिया गाठण्यासाठी निघाल्या होत्या. आजीने औषध आणण्यासाठी 500 रुपये दिले होते, ते घेऊन त्या मुली कशासाठी दक्षिण कोरिया गाठण्यासाठी जात होत्या...

Pune News : आजीने औषधासाठी 500 रुपये दिले, ते पैसे घेऊन दोन अल्पवयीन मुली निघाल्या दक्षिण कोरियाला, पुढे काय झाले...
Pune PoliceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 11:44 AM

पुणे | 2 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील एका अल्पवयीन मुलीस आजीने औषध आणण्यासाठी 500 रुपये दिले. मग ते पैसे घेऊन ती मुलगी आणि तिची एक मैत्रिण निघाली. या दोन 13 वर्षीय मुली दक्षिण कोरियात जाण्यासाठी पुणे येथील घरुन निघाल्या. त्यांच्या या प्रवासाची काहीच माहिती त्यांनी घराच्या मंडळींना दिली नाही. मग बऱ्याच वेळ झाल्यावर त्या परतल्या नाही अन् त्यांची शोधाशोध सुरु झाली. कशासाठी दक्षिण कोरियात जाण्याचे धाडस या अल्पवयीन मुली करत होत्या?

त्या मुलींना होते संगिताचे वेड

दोन अल्पवयीन मुलींना सांगिताचे वेड होते. दोन्ही मुली बीटीएस म्हणजे ‘बुलेटप्रूफ बॉय स्काउट्स’च्या प्रचंड चाहत्या होत्या. हा एक दक्षिण कोरियामधील संगीत क्लब आहे. मग या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. संधीची त्या वाट पाहत होते. आजीकडून 500 रुपये मिळाले आणि त्या माध्यमातून दक्षिण कोरिया गाठण्यासाठी त्यांनी पुणे सोडले.

आधी गाठले पुणे स्टेशन अन् निघाल्या

दोन्ही मुलींनी आधी पुणे स्टेशन गाठले. पुण्यावरुन मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. मुंबईत पोहोचल्यानंतर टॅक्सी केली. त्या टॅक्सीचालकाला एक फोन करायचा असल्याचे सांगत आजीला फोन केला. परंतु त्यावेळी मुली बेपत्ता झाल्यामुळे घरात गोंधळ सुरु झाला. आजीने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठले होते. तो फोन उचलला गेला नव्हता. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लागलीच तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

त्या फोनवर संपर्क केला अन्…

पोलीस अधिकारी अन्सीर शेख यांनी सांगितले की, आजीला आलेल्या त्या अनोळखी फोनवर पोलिसांनी संपर्क केला. तो फोन टॅक्सी चालकाचा निघाला. कॅब चालकाने मुलींना सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला पकडून ठेवा असे सांगत व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर कॅब चालकाने मुलींना परत गाडीत बसवले.

अशी झाले नातेवाईकांची भेट

कॅब चालकाने त्या मुलींना दादर येथील वाहतूक पोलिसांच्या बुशवर सोडले. त्या ठिकाणावरुन माटुंगा पोलीस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी त्या मुलींना बसवून ठेवले आणि पुण्यावरुन नातेवाईक मुंबईला येण्यासाठी निघाले. अखेर रात्री दीडच्या सुमारास मुलींची नातेवाईकांशी भेट झाली.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.