पुणेकरांनो.. लस घ्यायची बाकी आहे? रात्री 8 वा. ऑनलाईन स्लॉट बुकिंग करा

पुणे महापालिकेनं पुणेकरांना लस देण्यासाठी अपॉइंटमेंट किंवा स्लॉट बुकिंगसाठी वेळ ठरवून दिला आहे. त्यानुसार आज रात्री 8 वाजता लसीकरणासाठी अपॉईंटमेंट किंवा स्लॉट बुकिंग करता येऊ शकणार आहे.

पुणेकरांनो.. लस घ्यायची बाकी आहे? रात्री 8 वा. ऑनलाईन स्लॉट बुकिंग करा
corona-vaccination
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 3:28 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. दरम्यान, विविध शहरात लसीच्या तुटवड्यामुळे प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे. पुणे महापालिकेनं पुणेकरांना लस देण्यासाठी अपॉइंटमेंट किंवा स्लॉट बुकिंगसाठी वेळ ठरवून दिला आहे. त्यानुसार आज रात्री 8 वाजता लसीकरणासाठी अपॉईंटमेंट किंवा स्लॉट बुकिंग करता येऊ शकणार आहे. हे स्लॉट बुकिंग 10 मे अर्थात सोमवारसाठी असणार आहे. (Registration for vaccination in Pune will be possible from 8 pm tonight)

18 ते 44 वयोगटासाठी उद्या 6 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन

18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी उद्या 6 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 2 केंद्रांवर कोविशील्ड तर 4 केंद्रांवर कोवॅक्सिन ही लस उपलब्ध असेल. अपॉइंटमेंट/स्लॉट बुकींगची सुविधा रात्री 8 वाजता सुरू होईल. केवळ बुकींग असणाऱ्या नागरिकांनाच लस दिली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तर 45 वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या 111 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 101 केंद्रांवर कोविशील्ड तर 10 केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध असेल.

कोवॅक्सिन उपलब्ध असणाऱ्या 10 केंद्रांवर 12 एप्रिल 2021 पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल. तर कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर 22 मार्च 2021 पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य असेल. तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या 20 टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे. तशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

लसीसाठी नोंदणी कशी करावी?

नोंदणी प्रक्रिया खूप सोपी आहे. आपल्या मोबाईल फोनवर किंवा संगणक ब्राऊझरवर https://selfregifications.cowin.gov.in/ वर लॉगिन करा. येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल. आपण पोर्टलद्वारे निर्धारित वेळ मर्यादेत लसीसाठी नोंदणी करण्यास सक्षम असाल. सुमारे चार लोक मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात.

आपण पोर्टलवर नोंदणी करू शकत नसल्यास काय करावे?

बरेच लोक डिजिटल अनुकूल नसतात. अशा परिस्थितीत पोर्टलवर नोंदणी करणे त्यांना अवघड आहे. आपण इच्छित असल्यास आपण कोणत्याही सायबर कॅफेची मदत घेऊ शकता. आपण काही नाममात्र शुल्कामध्ये नोंदणीकृत असाल. हे शक्य नसले तरी घाबरून जाण्याची गरज नाही. आपण आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रास भेट देऊन देखील नोंदणी करू शकता. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही याबाबत सांगितले.

कोविन पोर्टलवर बदल करण्याचे पर्याय आहेत का?

एकदा नोंदणी केल्यास आपण ते सोयीनुसार बदलू देखील शकता. आपण ते बदलत असताना रद्द देखील करू शकता. जर आपण शहरात लसीचा पहिला डोस घेतला असेल, तर आपण दुसर्‍या डोससाठी केंद्र देखील निवडू शकता.

संबंधित बातम्या :

आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ

Positive Story | पुण्यात एकाच कुटुंबातील 21 जणांनी कोरोनाला परतवलं, बाळापासून आजीपर्यंत सर्व ठणठणीत

Registration for vaccination in Pune will be possible from 8 pm tonight

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.