हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश

हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांनाही प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. (Pune court Harshavardhan Jadhav)

हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश
माजी आमदार हर्षवर्धन जाधव
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 9:03 AM

पुणे : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुण्यातील 8 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. हर्षवर्धन जाधव यांना अमन चड्डा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. (Pune court orders to file FIR for allegedly beating Former MLA Harshavardhan Jadhav)

अखेर न्यायालयाने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हर्षवर्धन जाधवांना जामीन मिळण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र आता हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांनाही प्रकरण भोवण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, जाधव यांच्याकडून अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचं कारण 15 डिसेंबरला सांगण्यात आलं होतं. अखेर पुणे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना रिसतर अटक केली होती.

अमन अजय चड्डा यांच्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकारी इशा झा या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अमन चड्डा यांनी आपल्या तक्रारीत त्यांचे आई वडील जखमी झाल्याचं म्हटलं आहे.

तक्रारीत काय?

“पुण्यातील औंध भागातून माझे आईवडील दुचाकीवरुन जात असताना हर्षवर्धन जाधव यांनी अचानक आपल्या गाडीचा दरवाजा उघडल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली. वडिलांची नुकतीच अँजिओप्लास्टी आणि ओपन हार्ट ऑपरेशन झाली होती. हे सांगूनही हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या छातीवर बुक्क्या आणि लाथांनी मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.” असे अमन चड्डांनी तक्रारीत म्हटले होते

“हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असलेली महिला इषा झा यांनीही जाधव यांच्यासोबत संगनमत करुन शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांच्या पोटामध्ये आणि छातीवर लाथाबुक्क्या मारल्या. आईलाही ढकलून दिलं. आईच्या पायावर लाथ मारुन तिला ढकलून दिले. यामुळे तिच्या पायालाही गंभीर दुखापत केली,” असंही या तक्रारीत म्हटलं होतं. (Pune court orders to file FIR for allegedly beating Former MLA Harshavardhan Jadhav)

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई
  • काँग्रेस नेते रायभान जाधव यांचे हर्षवर्धन हे पुत्र
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • मनसे सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या :

ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक, रात्र तुरुंगातच काढावी लागणार

(Pune court orders to file FIR for allegedly beating Former MLA Harshavardhan Jadhav)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.