AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Darshana Pawar : MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणात मुख्य आरोपीस अटक

Darshana Pawar : MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी मिळाली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता.

Darshana Pawar : MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणात मुख्य आरोपीस अटक
| Updated on: Jun 22, 2023 | 11:02 AM
Share

अभिजित पोते, पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी मिळाली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. अखेरी त्याला अटक झाली आहे.  राहुल याला मुंबईतून अटक झाली आहे. या हत्याकांड प्रकरणात गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस माहिती देणार आहे. या प्रकारामुळे राज्यात खळबळ माजली होती.

काय होते प्रकरण

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता. ती बेपत्ता झाल्याची तक्रार १५ जून रोजी तिच्या पालकांनी नोंदवली होती. त्यानंतर १८ जून रोजी सकाळी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणी घातपाताची शक्यता पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती.

का केली हत्या

दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक आहे. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. दोघांपैकी दर्शना आधी एमपीएससी उत्तार्ण झाली. तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली.

त्यामुळे वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

हा पुरावा होतो महत्वाचा

दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला फिरण्यासाठी राजगडावर गेले. त्या दिवशी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी ते पोहचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. दोघे गड चढत असल्याचा प्रकार CCTV फुटेजमध्ये कैद झाला. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत होते. मात्र त्यानंतर 10 वाजता राहुल हंडोरे एकटाच परत आला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अन् त्याचा शोध सुरु केला. त्याच्या शोधासाठी पाच पथके तयार केली होती. अखरी त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.