रेडीरेकनरच्या दरात पुणे जिल्हा अग्रेसर ; पुणे, पिंपरी चिंचवडसहा, 23 गावांसाठी इतकी झाली दर निश्चिती

नव्याने समाविष्ठ झालेल्या 23 गावांमध्येही दरवाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील झालेली विकास कामे, महत्त्वाचे प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प याबरोबरच पुण्यात सुरु होत असलेली मेट्रोसेवा , याबरोबच मागील दोन वर्षात जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार )याच्या आधारे ही दरवाढ करण्यात आली आहे.

रेडीरेकनरच्या दरात पुणे जिल्हा अग्रेसर ; पुणे, पिंपरी चिंचवडसहा, 23 गावांसाठी इतकी झाली दर निश्चिती
पुणे जिल्हा रेडी रेकनरच्या दरात अग्रेसरImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 11:42 AM

पुणे- आजपासून राज्यात सर्वत्र रेडीरेकनरचे (RediRecner) नवीन दर लागू झाले आहे. याबाबत राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने काल ( गुरुवार) सांयकाळी याबाबतची घोषणा केली. नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रेडीरेकनरच्या दरात सर्वाधिक वाढ पुणे जिल्ह्यात दिसून आली आहे. जिल्ह्यात एकूण 8.5  टक्के दरवाढ झाली आहे. यामध्ये पुणे , पिंपरी-चिंचवडसह , पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation)नव्याने समाविष्ठ झालेल्या 23 गावांमध्येही दरवाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील झालेली विकास कामे, महत्त्वाचे प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प याबरोबरच पुण्यात सुरु होत असलेली मेट्रोसेवा , याबरोबच मागील दोन वर्षात जिल्ह्यात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार (Property purchase and sale transactions)याच्या आधारे ही दरवाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरात व पीएमआरडीए क्षेत्रात घर घेणे अधिक महाग झाले आहे. नोंदणी विभागाने यावेळी पहिल्यांदाच महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी स्वतंत्र रेडीरेकनर दर ठरवले आहे.

पुण्यातल्या दारात घसरण

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुणे शहरात रेडीरेकनरच्या दराबाबत एकूण 935 झोन तयार केलेत त्यानुसार रेडी रेकनरचे दर ठरवले आहेत. यामध्ये नोंदणी विभागानं एकूण 99 झोनमध्ये रेडीरेकनर दरात घट केली आहे. तर 137 झोनमध्ये कोणत्याही प्रकारची दर वाढ न करता रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवले आहेत. शहारातील ज्या भागात कचऱ्याचे व्यवस्थापन, कत्तलखाना, स्मशानभूमी, एसटीपी प्लॅन्ट असलेल्या भागातील दरामध्ये घट करण्यात आली आहे. तर 137 झोनमधील दरामध्ये स्थिर ठेवण्यात आले आहेत.

या भागात 25 टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ

पुणे शहरातील आंबेगाव खुर्द हायवे लगतच्या निवासी झोन, आंबेगाव गावठाण, वडगाव खुर्द औद्योगिक झोन आणि फुरसुंगी गावठाण परिसरात तब्बल 25 टक्क्यांपेक्षा अधिक दर वाढ झाली आहे. पुणे शहर 6.12 टक्के वाढ झाली आहे. समाविष्ट 23 गावांत 10.15 टक्के, पिंपरी-चिंचवड शहरात 12.36 टक्के वाढ करण्यात आली आहे.

Nanded Murder | खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू

Sanjay Raut On ED: आता रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास तेवढा ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी; राऊतांचा हल्लाबोल

म्हशीनं ‘या’ जनावरांना शिकवला चांगलाच धडा! कर्माचं फळ मिळालं थेट 5Gच्या स्पीडनं..! Video viral

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.