AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : पुण्याच्या कोथरूडमधला गुंड शरद मोहोळ तडीपार; खुनासह दाखल आहेत गंभीर गुन्हे

पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळ याची ओळख आहे. शरद मोहोळ टोळीने सरपंचाचे अपहरण करून खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Pune crime : पुण्याच्या कोथरूडमधला गुंड शरद मोहोळ तडीपार; खुनासह दाखल आहेत गंभीर गुन्हे
कुख्यात गुंड शरद मोहोळ
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 05, 2022 | 8:48 PM
Share

पुणे : गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याला पुण्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कोथरूड भागात दहशत असलेला गुंड शरद मोहोळला तडीपार करण्याच्या प्रस्तावास पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी मंजुरी दिली आहे. शरद हिरामण मोहोळ (वय 38, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून (Murder) केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) मोहोळला गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता.

दहशत माजविण्याचे गुन्हे

कारागृहाबाहेर आल्यानंतर शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी दहशत माजविण्याचे गुन्हे केले होते. या गुंड मोहोळला शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी तयार केला होता. यानंतर परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 57 (1) (अ) (1)मधील तरतुदींनुसार गुन्हेगार शरद मोहोळ याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

कोण आहे शरद मोहोळ?

पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळ याची ओळख आहे. शरद मोहोळ टोळीने सरपंचाचे अपहरण करून खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मोहोळ आणि आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. या खटल्यातून त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सध्या तो जामिनावर आहे.

Follow Us
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?