“शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 7:07 PM

"संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा. असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा"

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा
संभाजी भिडे

मुंबई : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली. “संभाजी भिडे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहेत. इतकंच नाही तर आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा. असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”, असं खरात म्हणाले.

सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांना तडीपार करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

संभाजी भिडे यांनी आज सांगलीत बोलताना कोरोना वगैरे सगळं थोतांड असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन सचिन खरात यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

संंभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?  

कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे”, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले. ते सांगलीत (Sangli) बोलत होते. इतकंच नाही तर वारकरी (Pandharpur Wari) रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असंही संभाजी भिडे म्हणाले. पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं, असं त्यांनी नमूद केलं.

वारी झाली असती तर कोरोना दिसला नसता 

या कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल,तर लोकांमध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती,तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं की कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की, कोरोना हे षडयंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा : संभाजी भिडे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI