Bakri Eid : यंदाच्या बकरी ईदला मिळेल चांगला नफा, पुण्यातल्या बकरी विक्रेत्यांना अपेक्षा; शेळ्यांचा दर किती? इथे वाचा…

मोठ्या बाजारपेठा भोसरी, चाकण आणि पिंपरी येथे आहेत. 20,000पेक्षा कमी शेळ्या उपलब्ध नाहीत, ज्यात लहान शेळ्यांचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दरही अधिक असून लोक अधिक पैसे देण्यास तयार आहेत.

Bakri Eid : यंदाच्या बकरी ईदला मिळेल चांगला नफा, पुण्यातल्या बकरी विक्रेत्यांना अपेक्षा; शेळ्यांचा दर किती? इथे वाचा...
शेळी खरेदीसाठी ग्राहकांची होत असलेली लगबग
Image Credit source: HT
प्रदीप गरड

|

Jul 05, 2022 | 7:30 AM

पुणे : बकरी ईद (Bakri Eid) जवळ येत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील दोन वर्षांत कोविडमुळे (Covid 19) अनेक मर्यादा होत्या. यंदा मात्र उत्साह दिसून येत आहे. तर बकरी विक्रेत्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. 10 जुलैला बकरी ईद (ईद-उल-अधा) आहे. त्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांची 20,000 ते 3 लाखांपर्यंत विक्री सुरू झाली आहे. पुण्यात आणि पिंपरी चिंचवड हद्दीत मोठ्या संख्येने शेळ्या विक्रीस आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून उत्सव केवळ कुटुंबांपुरते मर्यादित होते, तर यावर्षी सामाजिक सभा आणि भोजन मेजवानीला परवानगी दिली जाईल आणि परिणामी बकरी विक्रेत्यांना (Goat sellers) चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. पुण्यात भवानी पेठ, लक्ष्मी मार्केट, नाना पेठ, कोंढवा या भागात बकऱ्यांच्या विक्रीला वेग आला आहे.

अधिक पैसे देण्यासही तयार

मोठ्या बाजारपेठा भोसरी, चाकण आणि पिंपरी येथे आहेत. 20,000पेक्षा कमी शेळ्या उपलब्ध नाहीत, ज्यात लहान शेळ्यांचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दरही अधिक असून लोक अधिक पैसे देण्यास तयार आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते एका शेळीमागे 1 लाखापर्यंत खर्च करण्यास तयार आहेत, असे बकरी विक्रेत्यांनी सांगितले. पुणे शहरात भाव दुपटीने वाढल्याने अनेकांनी बकऱ्यांचा मोठा बाजार असलेल्या चाकणला जाणे पसंत केले आहे. बकऱ्यांच्या विविध जाती उपलब्ध असून अनेक लोक चाकण येथून शेळ्या शहरात आणून चढ्या दराने विकत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा शेळ्यांची अधिक खरेदी होत आहे. ग्राहकांनी शेळ्यांचे प्री-बुकिंग केले आहे. 7 जुलैपर्यंत त्यांना डिलिव्हरी केली जाईल, असे पिंपरी मार्केटमधील एका बकरी विक्रेत्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

यंदा मोठे स्टॉल्स

शेळीपालक चांगल्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा करत आहेत. विक्रेत्यांबरोबरच सोलापूर, नाशिक, कोल्हापूर आदी ठिकाणच्या शेळीपालकांनीही शेळ्या विक्रीसाठी स्टॉल लावले आहेत. भवानी पेठेत आपला स्टॉल लावलेल्या सोलापूर येथील एका शेळी विक्रेत्याने सांगितले, की वर्षभरापासून आमच्या शेतात शेळ्यांची काळजी घेतली जाते आणि पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या ठिकाणी आम्हाला चांगला दर मिळतो. दरम्यान, मागील दोन वर्षांत कोविडच्या भीतीमुळे शेळ्या विक्रीस आल्या नाहीत. यंदा मात्र मोठमोठे स्टॉल्स पाहायला मिळत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें