गजा मारणेच्या नऊ साथीदारांना बेड्या, हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई

कुख्यात गुंड गजा मारणेसह 150 साथीदारांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Gaja Marne accomplishes arrested)

गजा मारणेच्या नऊ साथीदारांना बेड्या, हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई
गजा मारणे
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 7:48 AM

पिंपरी चिंचवड : कुख्यात गुंड गजा मारणेच्या नऊ साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी पुणे-बंगळुरु महामार्गावर धिंगाणा घातला होता. त्यानंतर पोलिसांनी मारणेच्या साथीदारांना जेरबंद केलं आहे. (Pune Goon Gaja Marne accomplishes arrested by Hinjawadi Police)

गजा मारणेच्या साथीदारांनी 15 फेब्रुवारीला पुणे-बंगळुरु महामार्गावर विनापरवाना रॅली काढणे, आरडाओरडा करणे, सर्वसामान्यांची वाहनं रोखून दहशत माजवण्यासारखे प्रकार केले होते. या प्रकरणी गजासह 150 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मोक्का’अंतर्गत कारवाई

पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात गजा मारणेविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला आहे. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारावाई केली जाईल, असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी याआधीच स्पष्ट केले होते.

गुन्हा नेमका का?

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या.

त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा भरणे यांने टोल न भरणे तसेच आधीच्या दुकानातून जबरदस्तीने सामान घेतल्याचे काम त्याच्या साथीदाराने केले होते. तसा आरोप गाजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर ठेवण्यात आला आहे.

गजा मारणेची मिरवणूक लँड क्रुझरमध्ये

गजा मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. गजा बसलेल्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये होती. मिरवणुकीत असलेली लँडक्रझर गाडी पुण्यातील काही मोजक्याच लोकांकडे आहे. गजा मारणेची या गाडीतून मिरवणूक निघाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती. गजा मारणे याच्याकडे असलेली लँडक्रुझर कार ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची असल्याचं बोललं जातं. (Pune Goon Gaja Marne accomplishes arrested by Hinjawadi Police)

गजा मारणे यांने केलेल्या शक्तीप्रदर्शनाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्याच्या पोलीस व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच गुंडांना रान मोकळं सोडल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता.

संबंधित बातम्या :

गजा मारणेच्या अडचणीत वाढ, पिंपरी चिंचवड पोलीस मोक्का लावणार

गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश

(Pune Goon Gaja Marne accomplishes arrested by Hinjawadi Police)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.