AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | पुण्यात रुग्णवाहिकेत रुग्णाचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. (Pune Kondhwa Doctor beat by Patient Relatives)

CCTV | पुण्यात रुग्णवाहिकेत रुग्णाचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात डॉक्टरला मारहाण
| Updated on: Apr 26, 2021 | 12:26 PM
Share

पुणे : एकीकडे राज्यातील डॉक्टर कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. तर दुसरीकडे पुण्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. डॉ. सिद्धांत तोतला असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉ. सिद्धांत तोतला यांना कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर 15 ते 20 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Pune Kondhwa Prime Hospital Doctor beat by Dead Patient Relatives)

नेमकं प्रकरणं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तोतला 21 एप्रिलला कोंढवा येथील प्राईम रुग्णालयात भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक कार्डियक रुग्णवाहिका एका रुग्णाला घेऊन त्या ठिकाणी आली. यानंतर डॉ. तोतला यांनी त्याला तपासले. मात्र त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळवले.

यानंतर त्याच रुग्णालयातील डॉ. ताबीश आणि डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. यानंतर त्यांनी त्या रुग्णाच्या मृत्यू झाल्याची माहिती तिकडे जमलेल्या 15 ते 20 जणांना दिली. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांसह लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली.  त्यासोबत रुग्णालयातील अकाऊंटट इमाम हुल्लर यांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी करण्यात आले. तसेच सुरक्षा रक्षकाच्या केबिनची काच फोडण्यात आली. त्याशिवाय रुग्णालयासमोरील दरवाजावर दगड फेकून त्याचेही नुकसान करण्यात आले.

पोलिसात तक्रार दाखल 

ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर डॉ. तोतला यांनी याप्रकरणी कोंढवा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. (Pune Kondhwa Prime Hospital Doctor beat by Dead Patient Relatives)

संबंधित बातम्या : 

नातवंडं म्हणाली, आजी नव्वदी झालेय, गडाखालीच थांब, कोरोनाला हरवलेल्या आजींनी पोरांना मागे टाकलं

कोरोनाची लक्षणे आढळल्याने आत्महत्या, किचनमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.