Pune Corona | पुण्यात निर्बंध कडक करण्यावर चर्चा, अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत (Pune Lockdown Ajit Pawar Corona Meeting)

Pune Corona | पुण्यात निर्बंध कडक करण्यावर चर्चा, अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 9:34 AM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत बैठकीत निर्णय होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरु आहे. (Pune Lockdown News Deputy CM Ajit Pawar attends Corona Review Meeting Update)

या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित आहेत.

लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.

पुणे कोरोना अपडेट :

गुरुवार 1 एप्रिल 2021 ◆ उपचार सुरु : 35,849 ◆ नवे रुग्ण : 4,103 (2,73,446) ◆ डिस्चार्ज : 2,077 (2,32,260) ◆ चाचण्या : 20,681 (१14,99,714) ◆ मृत्यू : 35 (5,337)

लॉकडाऊनची गरज नाही, महापौरांचं मत

पुण्यात गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बोललं जात आहे. पण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची स्थिती काहीशी चिंताजनक बनली असली तर लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा केला आहे. पण प्रशासन मात्र लॉकडाऊनच्या मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय. (Pune Lockdown News Deputy CM Ajit Pawar attends Corona Review Meeting Update)

संबंधित बातम्या :

पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?

(Pune Lockdown News Deputy CM Ajit Pawar attends Corona Review Meeting Update)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.