पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा ; जाणून ‘घ्या’ कारण

पौड रोड परिसरातील भीमनगर मध्ये डी पी रस्त्याचे काम सुरू आहे. तिथे असलेल्या दोन स्वच्छतागृहांपैकी पैकी एक स्वच्छतागृह पाडण्यात आले.त्यामुळे परिसरातील नागिरीक स्वछतागृहाच्या सुविधेपासून वंचित राहत असल्याचं सांगत महापौरांवर कारवाईची मागणी देविदास ओव्हाळ या ज्येष्ठ नागरिकाने केली होती.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा ; जाणून 'घ्या' कारण
Murlidhar Mohol
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 7:20 PM

पुणे – कोथरुडमध्ये रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारं सार्वजनिक शौचालय पाडल्याप्रकरणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाला पुणे सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पौड रोड परिसरातील भीमनगर मध्ये डी पी रस्त्याचे काम सुरू आहे. तिथे असलेल्या दोन स्वच्छतागृहांपैकी पैकी एक स्वच्छतागृह पाडण्यात आले.त्यामुळे परिसरातील नागिरीक स्वछतागृहाच्या सुविधेपासून वंचित राहत असल्याचं सांगत महापौरांवर कारवाईची मागणी देविदास ओव्हाळ या ज्येष्ठ नागरिकाने केली होती. ओव्हाळ यांची तक्रार गृहीत धरत नायलयाने महापौरांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

महापौर मुरलीधर मोहोळ (रा. मयूर कॉलनी, कोथरूड), ठेकेदार वसंत चव्हाण (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि ठेकेदार राहुल शिवाजी शिंदे (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने कोथरूड पोलिसांना दिले आहेत.

नागरिकांनी दुसरीकडे राहायला जावे या घटनेत तक्रारकर्ते देविदास भानुदास ओव्हाळ हे पौड फाटा येथील शीलाविहार कॉलनीमध्ये रहिवासी आहेत. ते राहता असलेल्या भागातील सार्वजनिक  स्वच्छतागृह वापरता येऊ नये, नागरिकांनी घर सोडून दुसरीकडे राहण्यास जावे,  या हेतूने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काही व्यक्तींच्या मदतीने २० ऑक्टोबर रोजी स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून टाकले, असा आरोप करण्यात आला होता.

आरोपात तथ्य नाही दरम्यान या आरोपात कोणतंहीतथ्य नसल्याचा दावा महापौरांनी केला आहे. या ठिकाणी जावेद शेख नावाच्या व्यक्तीचं बांधकाम आहे. त्यावर कारवाई होऊ नये, म्हणून त्यांनी ओव्हाळ यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना आपल्या विरोधात संगनमताने कट रचण्यात आल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

VIDEO: बिपीन रावत यांच्या अपघाताचा तो व्हिडिओ खरा; शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Nagpur Railway | रेल्वेतून दहा किलो गांजा जप्त, कोचच्या बाथरुममध्ये होता पडून; आरोपींचा पत्ता नाही

जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन, ‘पवारांना खुर्ची देताना माणुसकीचं दर्शन’, भाजपवर शरसंधान

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.