Nagpur Railway | रेल्वेतून दहा किलो गांजा जप्त, कोचच्या बाथरुममध्ये होता पडून; आरोपींचा पत्ता नाही

जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 10 किलो 362 ग्राम एवढं आहे. त्याची बाजारात किंमत 1 लाख 3 हजार 720 रुपये असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आर. एल. मीना यांनी दिली.

Nagpur Railway | रेल्वेतून दहा किलो गांजा जप्त, कोचच्या बाथरुममध्ये होता पडून; आरोपींचा पत्ता नाही
जप्त करण्यात आलेल्या गांजासह रेल्वेची कारवाई करणारे कर्मचारी.

नागपूर : रेल्वे पोलिसांनी आणखी एका गांजा तस्करीच्या घटनेचा पर्दाफाश केलाय. विशाखापट्टणम – दिल्ली एक्स्प्रेसमधून ही गांजा तस्करी केली जात होती. यात 10 किलो गांजा जप्त करण्यात आला. परंतु, आरोपींचा पत्ता लागला नाही.

जनरल कोचमध्ये 5 बंडल गांजा

गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या मार्गाने गांजा तस्करी होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. दक्षिणेकडून दिल्लीकडं जाणाऱ्या गाड्यांमध्ये हे होत असल्याचं समोर येत आहे. विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्स्प्रेस या गाडीतून गांजा नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचत नागपूर स्थानकावर गाडी येताच चेकिंग सुरू केली. जनरल कोचमध्ये 5 बंडल गांजा मिळून आला.

गांजाची किंमत एक लाखाच्या वर

जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 10 किलो 362 ग्राम एवढं आहे. त्याची बाजारात किंमत 1 लाख 3 हजार 720 रुपये असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आर. एल. मीना यांनी दिली. नागपूर रेल्वे स्थानकावर नियमित गांजा कारवाई होत असते. मात्र याची तस्करी थांबताना दिसून येत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने याच्या खोलात जाण्याची गरज आहे.

कोचच्या बाथरूममध्ये सापडला गांजा

ही घटना आठ डिसेंबर रोजी निरीक्षक आरपीएफ नागपूर यांच्या मार्गदर्शनात आरक्षक मुनेश गौतम यांनी उघडकीस आणली. गस्तीच्या दरम्यान पहाटे एक वाजता प्लाटफार्म नंबर तीनवर ट्रेन नंबर 12807 च्या D-2 डब्यात गांजाची वास आली. कोचच्या बाथरूममध्ये तपासणी केली असता गांजाची बंडल लावारीस पडली होती. आजूबाजूच्यांना विचारले असता कोणतीही माहिती मिळू शकली नाही. राजपत्रित अधिकारी चंद्रशेखर लक्ष्मणराव, क्षेत्रपाल नायब तहसीलदार नागपूर शहर यांच्यासमोर सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव यांच्याद्वारे पंचनाम्याची कारवाई करण्यात आली.

Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तुसंग्रहालयासाठी पाठपुरावा; विभागीय आयुक्तांचे आश्वासन, चिंचोली शांतीवनाला भेट

Nagpur | संरक्षण दल प्रमुखांचा मृत्यू दुर्दैवी, सत्ताधाऱ्यांनी अपघाताची माहिती द्यावी; विजय वडेट्टीवार यांचं मत

Nagpur | धोकादायक ! आरोग्य सर्वेक्षणात बालकांचा लठ्ठपणा वाढला, मुलींच्या गुणोत्तरात घट?

 

Published On - 7:02 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI