AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune metro : महिनाभरानंतर पुण्याची मेट्रो कशी? उत्पन्न किती? सुविधा काय? वाचा सविस्तर…

6 मार्च रोजी सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसांत सुमारे 6 लाख प्रवाशांनी पुणे (Pune) मेट्रोने (Metro) प्रवास केला आहे. या कालावधीत दोन कार्यरत मेट्रोने एकत्रितपणे 84 लाख रुपयांचे उत्पन्न (Revenue) मिळवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Pune metro : महिनाभरानंतर पुण्याची मेट्रो कशी? उत्पन्न किती? सुविधा काय? वाचा सविस्तर...
पुणे मेट्रो, संपादित छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Apr 07, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : 6 मार्च रोजी सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसांत सुमारे 6 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवास केला आहे. या कालावधीत दोन कार्यरत मेट्रोने एकत्रितपणे 84 लाख रुपयांचे उत्पन्न (Revenue) मिळवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मेट्रो सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 6 मार्च रोजी करण्यात आले. पुणे मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा 33.1 किमी लांबीचा असेल आणि त्यात वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचा समावेश असेल. सध्या, मेट्रो या दोन मार्गांवर अंशतः कार्यान्वित आहे – वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत 5 किमीची लाइन आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडीपर्यंत 7 किमीची लाFन – दोन मार्गांवर पाच मेट्रो स्टेशन आहेत. या वर्षी डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून संपूर्ण लाइन लोकांसाठी खुली करण्याची योजना आहे.

प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्या दिवसापासून पुणे मेट्रोला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, ज्यांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. 6 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत गेल्या 30 दिवसांत सुमारे 6 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केला. तब्बल 75 टक्के प्रवाशांनी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाने प्रवास केला तर उर्वरित पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी मार्गाने प्रवास केला, अशी माहिती पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली आहे. 13 मार्च रोजी सर्वाधिक 67,350 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यादिवशी 10 लाख रुपये उत्पन्न मिळाले.

मोबाइल अॅप्लिकेशनदेखील लॉन्च

पुणे मेट्रोने एक मोबाइल अॅप्लिकेशनदेखील लॉन्च केले आहे, जे नागरिकांना त्यांच्या मोबाइल फोनवर तिकीट बुक करण्यास सक्षम करते आणि याद्वारे सेवेचे अपडेटदेखील ते मिळवू शकतात. या महिन्यात एकूण 20,346 प्रवाशांनी तिकीट बुकिंगसाठी मोबाइल अॅप्लिकेशनचा लाभ घेतला. दरम्यान, महा-मेट्रोनेही शहरातील मार्ग वाढविण्याची तयारी सुरू केली असून, लवकरच त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम केला जाणार आहे.

आणखी वाचा :

NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…

Pune crime : उधारीचे पैसे मागितले म्हणून कुऱ्हाडीनं सपासप वार केले, हडपसरमध्ये सराईतास बेड्या

Video : पुन्हा वणवा..! जुन्नरमधल्या राजुरात अज्ञातांनी लावली आग, गैरसमजुतीतून होतायत प्रकार; काय प्रकरण? वाचा…

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.