गडकरींचा पुढाकार, पुणे विभागासाठी 7 हजार ‘एम्फोटेरेसिन बी’ इंजेक्शन उपलब्ध, म्युकरमायकोसिस रुग्णांना दिलासा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून पुणे विभागाला एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन्सचा 7 हजाराचा साठा मिळाला आहे.

गडकरींचा पुढाकार, पुणे विभागासाठी 7 हजार 'एम्फोटेरेसिन बी' इंजेक्शन उपलब्ध, म्युकरमायकोसिस रुग्णांना दिलासा
म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 7:00 PM

पुणे : राज्यात कोरोनासह म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय. अशावेळी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीची लागण झालेल्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या एम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून पुणे विभागाला एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन्सचा 7 हजाराचा साठा मिळाला आहे. गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने 50 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले आहेत. (7 thousand amphotericin B injection on mucormycosis available for Pune division)

जेनेटीक लाईफ सायन्सेसने पुणे विभागासाठी कंपनीने आज 5 हजार इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जेनेरिक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षिरसागर यांनी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्द केले. येत्या आठवडयात पुणे विभागसाठी आणखी 2 हजार इंजेक्शन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिलासा देणारे ठरेल असं जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

वर्ध्यात ‘एम्फेटेरेसिन बी’ इंजेक्शनचीही निर्मिती

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये आता एम्फेटेरेसिन बी हे इंजेक्शनही तयार केलं जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने वर्ध्यातील कंपनीला ही परवानगी दिली आहे. त्यानंतर या कंपनीने एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनच्या निर्मितीला सुरुवात केली आहे.

औरंगाबादेत म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड

औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ होताना दिसतेय. याच कारणामुळे शहरातील घाटी रुग्णालयात या रोगावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतच आहेत. सध्या घाटी रुग्णालयात एकूण 90 म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार केला जात आहे. या सर्व रुग्णांना महागडे इनजेक्शन तसेच सर्व औषध मोफत दिले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत सुमारे एक हजार म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 100 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे 1 हजार 500 च्या आसपास रुग्ण, राजेश टोपेंची केंद्राकडे 3 महत्वाच्या मागण्या

Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…

7 thousand amphotericin B injection on mucormycosis available for Pune division

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.