Municipal election 2022 : पुणे महापालिकेची महिला आरक्षण सोडत जाहीर; कोणाला कोणता प्रभाग? वाचा सविस्तर…

आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका (Pune & Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणुकीसाठीचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण (Reservation) आज निश्चित झाले. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठीचे तर पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे.

Municipal election 2022 : पुणे महापालिकेची महिला आरक्षण सोडत जाहीर; कोणाला कोणता प्रभाग? वाचा सविस्तर...
पुणे महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 1:03 PM

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊ या पुणे पालिकेचे इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण…

पुणे महापालिकेची सोडत

आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण आज निश्चित झाले. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठीचे तर पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणाची सोडत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे काढली गेली. महापालिकेची सदस्यसंख्या 173 आहे. तर महिला आरक्षण असल्याने महिलांची सदस्यसंख्या 87 एवढी झाली आहे.

पालिकेचे नाव : पुणे महानगरपालिका

– अनुसूचित जाती

हे सुद्धा वाचा

– एकूण जागांची संख्या – 173

– पैकी महिलांकरिता आरक्षित जागा – 12

पुणे महापालिका अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग

  • प्रभाग 9 – येरवडा
  • प्रभाग 3 – लोहगाव, विमाननगर
  • प्रभाग 42 – रामटेकडी, सय्यदनगर
  • प्रभाग 47 – कोंढवा बुद्रुक
  • प्रभाग 49 – मार्केटयार्ड, महर्षीनगर
  • प्रभाग 46 – महम्मदवाडी उरळी देवाची
  • प्रभाग 20 – पुणे स्टेशन, आंबेडकर रोड
  • प्रभाग 26 – वानवडी, वैदुवाडी
  • प्रभाग – 21 कोरेगाव पार्क, मुंढवा
  • प्रभाग 48 – अप्पर इंदिरानगर
  • प्रभाग 10 शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
  • प्रभाग – 4 खराडी वाघाली

अनुसूचित जमाती

– एकूण जागांची संख्या – 173

– पैकी महिलांकरीता आरक्षित जागा – 01

अनुसूचित जमाती

  • प्रभाग 1 क्र. – 1 ब महिला
  • प्रभाग 14 अ – एसटी खुला

सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)

– एकूण जागांची संख्या – 173

– पैकी महिलांसाठी आरक्षित जागा – 74

सध्याचे पक्षीय बलाबल काय?

    • भाजपा – 99
    • राष्ट्रवादी – 42
    • काँग्रेस – 10
    • सेना – 10
    • मनसे – 2
    • एमआयएम – 1
    • एकूण जागा – 164

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.