Budget 2021 | महापालिकेचं अंदाजपत्रक, पुणेकरांना काय मिळणार?

पुणे महानगरपालिकेचं यंदाच्या वर्षाचं अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार उद्या (29 जानेवारी) सादर करणार आहेत.

Budget 2021 | महापालिकेचं अंदाजपत्रक, पुणेकरांना काय मिळणार?
पुणे महानगरपालिकेचं यंदाच्या वर्षाचं अंदाजपत्रक

पुणे : पुणे महानगरपालिकेचं यंदाच्या वर्षाचं अंदाजपत्रक म्हणजेच बजेट 2021 हे आयुक्त विक्रम कुमार उद्या (29 जानेवारी) सादर (Pune Municipal Corporation Budget 2021) करणार आहेत. लॉकडाऊनमध्ये पालिकेचं उत्पन्न पुर्णपणे घटलं. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमकं काय मिळणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे (Pune Municipal Corporation Budget 2021).

2020 ते 2021 च्या सुरुवातीपर्यंत पालिकेला 3 हजार 285 कोटी रुपये प्राप्त झालेत. त्यापैकी पालिकेने 2 हजार 993 कोटी रुपये खर्च पण केलेत. अवघे 250 ते 300 कोटी रुपये सध्या पालिकेकडे शिल्लक आहेत. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात आयुक्त पालिकेवर कोणता भार टाकणार? आणि किती तरतूद करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

पुणे पालिकेला 2020 ते 2021 दरम्यान किती उत्पन्न मिळालंय?

>> 1 एप्रिल 2020 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत पालिकेला 3 हजार 285 कोटी मिळाले

>> त्यापैकी एलबीटी 25 कोटी, जीएसटी 1532 कोटी, मिळकर कर 1016 कोटी, बांधकाम शुल्क 282 कोटी मिळाले

>> पाणीपट्टी 201 कोटी तर इतर 158 कोटी आणि शासकीय अनूदान 71 कोटी मिळाले

>> असा एकुण 3 हजार 285 रुपयांच उत्पन्न पालिकेला मिळालं

महापालिका लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलीये. त्यामुळे आयुक्त कसं अंदाजपत्रक सादर करतात याकडे पुणेकरांच लक्ष लागलं आहे.

Pune Municipal Corporation Budget 2021

संबंधित बातम्या :

Budget 2021 : तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय? मग ही बातमी वाचा

‘नोकरी’वरून सरकारची चहूबाजूंनी कोंडी; बजेटमध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

Budget 2021 |अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योग जगतात मोठ्या घडामोडी, ‘या’ 130 कंपन्या तिमाही निकाल सादर करणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI