AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | पुणेकरांच्या पाण्यासाठी पुणे मनपाकडून ही मागणी, मनपा आयुक्तांनी पाठवले…

Pune News | यंदा पाऊस कमी झाला आहे. पुणे शहरातील धरणांमध्ये जलसाठा पुरेसा आहे. परंतु पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. पुणे मनपाने यासंदर्भात आपली मागणी नोंदवल्यानंतरही पाणी कपात झाली आहे.

Pune News | पुणेकरांच्या पाण्यासाठी पुणे मनपाकडून ही मागणी, मनपा आयुक्तांनी पाठवले...
| Updated on: Oct 19, 2023 | 11:49 AM
Share

पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी झाला. त्याचा परिणाम आता होणार आहे. पुणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा पुरेसा आहे. परंतु भविष्यातील नियोजनामुळे पुणे मनपास मागणीनुसार पाणी मंजूर झालेले नाही. यामुळे पुणे महापालिकेला पाण्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी केली आहे. जलसंपदा विभागाने २०२३ -२४ या वर्षासाठी २० टीएमसी पाणी द्यावे. पुणे मनपास मंजूर झालेले १२.१८ टीएमसी पाणी अपूर्ण आहे. कारण ३४ गावांचा समावेश पुणे मनपात झाला आहे. यामुळे पुणे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे, अशी मागणी पुणे मनपाकडून करण्यात आली आहे. पुणे मनपा आयुक्त पत्र विक्रमकुमार यांनी त्यासाठी जलसंधारण विभागाला पत्र पाठवले आहे.

पुण्यात एनडीएमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेटचा मृत्यू

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) प्रशिक्षण घेणारा महाराष्ट्रातील कॅडेटचा मृत्यू झाला आहे. प्रथम महाले असे त्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

PMPL ने विना तिकीट प्रवास

PMPL ने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. PMPL कडून गेल्या 15 दिवसांत 619 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाकडून या प्रवाशांना 4 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पीएमपीएलकडून शहरभरात तिकीट तपासणी करणारी भरारी पथके वाढवली आहे. तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांवर 500 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात टँकरची संख्या घटली

पुणे जिल्ह्यात टँकरची संख्या घटली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गावे टँकर मुक्त झाली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मात्र अजूनही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यात अजून 114 टँकर सुरू आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना दिलासा मिळाला आहे. यामुळे अनेक गावांत टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यात टँकरची संख्या 200 पर्यंत गेली होती.

दुकान फोडून जबरी चोरी

पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. दुकान फोडत 5 लाख 25 हजार रुपये लुटले गेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा दुकान फोडले गेले होते. या प्रकरणी आकाश उर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने या आधी देखील पुण्यात अनेक ठिकाणी चोरी केली आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.