AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Meeting : “लाठीचार्जमुळे झालेलं डॅमेज भरून काढण्यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक, कोट्यवधींचा चुराडा”

Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting : जालन्यातील लाठीमार डॅमेज अन् राज्य मंत्रिमंडळ बैठक; विरोधीपक्षातील नेत्याचा शिंदे सरकारवर शाब्दिक हल्ला. म्हणाल्या लाठीचार्जमुळे झालेलं डॅमेज भरून काढण्यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक!

Cabinet Meeting : लाठीचार्जमुळे झालेलं डॅमेज भरून काढण्यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक, कोट्यवधींचा चुराडा
| Updated on: Sep 16, 2023 | 3:02 PM
Share

छत्रपती संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आजपासून पुढचे दोन दिवस इथं मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी ही बैठक तर राजकीय खेळी आहे. लाठीचार्ज झाल्याने ही बैठक घेतली जात आहे. काहीतरी करून दाखवण्यासाठी हे सगळं करत आहेत. लाठीचार्ज करुन झालेलं डॅमेज भरून काढण्यासाठी ही बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कोट्यवधी रूपयांचा चुराडा करत आहेत, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकारवर घणाघात केलाय.

RSS च्या कार्यकारणी पुण्यात समिती बैठक पार पडली. पुण्यातील स. प. महाविद्यालयामध्ये संघ परिवाराची ही बैठक झाली. यासाठी देशभरातून 36 संघटनांचे 267 प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावर सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र डागलंय. निवडणुका बघून हे सगळं घडत आहे. त्यांना माहिती आहे की, भाजपाबद्दल मोठी नकारात्मकता राज्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्यात ठेवू नये. त्यांना दिल्लीत पाठवावं म्हणून ही बैठक महाराष्ट्रात होत आहे. कदाचित त्याचमुळे पंकजा मुंडे यांनी महारष्ट्रामध्ये यात्रा काढली. कारण भाजपला माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकू शकत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

तानाजी सावंत यांच्यावर सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेत. लवकरच मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे. अनेक घोटाळे आरोग्य खात्यात देखील झाले आहेत. वारीत देखील आरोग्य मंत्र्याने मोठा घोटाळा केला आहे. या सगळ्या प्रकरणात कदाचित आरोग्यमंत्र्यांचं पददेखील जाईल. लवकरच पुरावे घेऊन समोर येणार आहे, असं सुषमा अंधारे म्हणल्या आहेत.

मी दर महिन्याला एक एपीसोड घेऊन येणार आहे, असं सांगितलं होतं. ही पत्रकार परिषद लक्ष्मण म्हात्रे या व्यक्तीची मुबंईत बोरिवलीत असलेल्या स्थावर मालमत्ता होती. त्याच्याबाबत आहे. त्यांच्या मुलीच्या मुलांनी आता याबाबत तक्रार केली आहे. 1995 ला दाखल झालेली कागदपत्रे नोंदणी 2015 ला नोंदवली गेली आहेत. शीतल म्हात्रे यांच्या सासऱ्याचं नाव दाखवून कागदपत्र बनवली गेली. ज्या कुमार म्हात्रेचा मृत्यू 1999 ला झाला आहे. त्यांची सही 2015 ला करण्यात येते.हे सगळं कस शक्य आहे.हे सगळं नगरविकास विभागाचे आहे.मग नगरविकास खात्याला कोणीही फसवू शकत का? असा प्रश्न आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....