AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात सर्वत्र फिरा पीएमपीएमएल बसमधून, या मार्गांचा विस्तार…बससेमध्ये मोफत पाससुद्धा

Pune PMPML expands six routes: पीएमपीएमएलकडून मोफत पास योजनाही सुरु केली आहे. पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शाळा सुरु होणार आहे. यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पास दिली जाणार आहे.

पुण्यात सर्वत्र फिरा पीएमपीएमएल बसमधून, या मार्गांचा विस्तार...बससेमध्ये मोफत पाससुद्धा
pmpml
| Updated on: Jun 12, 2024 | 8:04 AM
Share

पुणे शहरात मेट्रो सुरु होण्यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ची सेवा होती. शहरात अनेक मार्गांवर ही सेवा दिली जात होती. परंतु शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत काही ठिकाणी पीएमपीएमएल बसेस जात नव्हता. आता मेट्रो सेवेला जोडून काही मार्गांचा विस्तार पीएमपीएमएलकडून करण्यात आला आहे. एकूण सहा मार्गांचा विस्तार केल्यामुळे पुणे शहरातील नागरिकांची सुविधा होणार आहे.

कोणत्या मार्गांचा विस्तार

PMPL बसच्या एकूण सहा मार्गांचा होणार विस्तार करणार आहे. शहरात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता PMPL प्रशासनाचा हा निर्णय घेतला आहे.

या सहा मार्गाचा होणार विस्तार

  1. दिघी ते भोसरी मार्गाचा विस्तार पिंपरी मेट्रो स्टेशनपर्यंत
  2. नऱ्हेगाव ते स्वारगेट मार्गाचा विस्तार सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत
  3. स्वारगेट ते नांदेडगाव मार्गाचा विस्तार बागेश्री सोसायटीपर्यंत
  4. हडपसर ते वडकीगाव मार्गाचा विस्तार मस्तानी तलावापर्यंत
  5. सेक्टर क्र.१२ ते भोसरी मार्गाचा विस्तार नाशिक फाटा मेट्रो स्टेशनपर्यंत
  6. इंटरनिटी कंपनी (हिंजवडी) ते शिवाजी चौक या मार्गाचा विस्तार मुकाई चौकापर्यंत

विद्यार्थ्यांना मोफत पास

पीएमपीएमएलकडून मोफत पास योजनाही सुरु केली आहे. पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शाळा सुरु होणार आहे. यामुळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पास दिली जाणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही मोफत पास देण्यात येणार आहे. तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना 75 टक्के सबसिडीत पास दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.

पीएमपी कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

दोन पीएमपी बसच्यामध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पुण्यातील कात्रज चौकात घडली. कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पीएमपीची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर (वय ४२) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुजर हे कंत्राटी कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.