पुणे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार? काय आहे कारण?

Pune Auto Services : पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मिळून सुमारे 40,000 ते 45,000 हजार रिक्षांनी ओला, उबेर या कंपन्यांशी करार केलेला आहे.

पुणे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार? काय आहे कारण?
pune auto
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 4:55 PM

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर लोकप्रिय झालेल्या ओलो अन् उबेर या रिक्षा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतलेल्या एका निर्णयामुळे या रिक्षा बंद होणार आहे. पुणे शहरात काही ठिकाणी प्रिपेड रिक्षा सेवा सुरु झाली आहे. परंतु ती सर्वत्र नाही. दुसरीकडे ओलो, उबेर रिक्षा सेवा सर्वत्र होती. आता ती बंद होणार असल्याने पुणेकरांना पर्यायी वाहतूक मार्ग शोधावा लागणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडीमधील सुमारे 40,000 ते 45,000 हजार रिक्षांनी ओला, उबेर या कंपन्यांशी करार केला होता.

का होणार बंद

‘मोटार वाहन मार्गदर्शक सूचना- 2020’ नुसार ओलो, उबेरसह चार कंपन्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही. त्यात मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे यांचा समावेश आहे. यामुळे या चार कंपन्यांना पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने परवाना नाकारला आहे.

हे सुद्धा वाचा

असा होता अर्ज

पुणे परिवहन विभागाकडे ओला, उबेर, रॅपीडो आणि किव्होल्युशन टेक्नॉलॉजीजने तीन चाकी सेवेसाठी अर्ज केला होता. यामध्ये ओला, उबरने तीन चाकीसोबत चारचाकी हलक्या वाहनांसाठी अर्ज केला होता. परंतु त्यांनी नियमाप्रमाणे पुर्तता केली नाही. यामुळे चारही कंपन्यांचा परवाना नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया यांना चारचाकी हलकी मोटार वाहने परवाना जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

उच्च न्यायालयाचा होता आदेश?

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता परवाना म्हणजेच ऍग्रिगेट टॅक्सी सेवा देणाऱ्यांना लायसन्स काढावं लागेल. हे लायसन्स काढण्यासाठी राज्य सरकारला अधिसूचना जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी ज्यांना परवाना मिळेल, त्यांना टॅक्सी सेवा देता येईल. ज्यांना परवाना मिळणार नाही, त्यांना रस्त्यांवर वाहनं चालवता येणार नाहीत, असं हायकोर्टानं नमूद केलंय. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणारे कोणत्या कारणास्तव अर्ज फेटाळला, तर त्याबाबत अपिलही ऍग्रिगेटर कंपन्या करु शकतील.

ओला, उबेर बंद होणार?

आरटीओच्या निर्णयानंतर पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेली ओला उबेरची सेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्यांच्या ॲग्रीगेटर लायसन्सला परवानगी नाकारली आहे.

यामुळे होत्या लोकप्रिय

पुणे शहरात प्रवास करण्यासाठी पुणेकर स्वत:चं वाहन वापरतात. पण स्वत:चे वाहन नसल्यास PMPML, रिक्षा, कॅब किंवा ओला उबर रिक्षाचा वापर करतात. यात स्वस्त आणि परवडणारी सेवा ओला, उबेरकडून सेवा पुरवणाऱ्या रिक्षांचा वापर होत होता.

Non Stop LIVE Update
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
... तर मी राजीनामा देऊन, पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भावूक
... तर मी राजीनामा देऊन, पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भावूक.
थेट मशिदीतून निघताय फतवे, राज ठाकरेंचा काँग्रेससह ठाकरे गटावर आरोप काय
थेट मशिदीतून निघताय फतवे, राज ठाकरेंचा काँग्रेससह ठाकरे गटावर आरोप काय.
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार
माझ्या नादी लागू नको... अजितदादांची दमदाटी कुणावर? सुळेंचा पलटवार.
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा
उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार, जेलधून बाहेर येताच केजरीवाल यांचा दावा.
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.