Aditya-L1 Sun Mission : आदित्य L1 रोज किती फोटो पाठवणार, पुणे शहरातील शास्त्रज्ञांनी दिले अपडेट

Pune Aditya-L1 Sun Mission News : आदित्य एल 1 म्हणजे सूर्याचा अभ्यास करण्याची ईस्त्रोची मोहीम आजपासून सुरु झाली आहे. या मोहिमेत पुणे शहरातील शास्त्रज्ञांनी बनवलेले पेलोड महत्वाचे काम करणार आहे. पेलोड रोज फोटो पाठवणार आहे.

Aditya-L1 Sun Mission : आदित्य L1 रोज किती फोटो पाठवणार, पुणे शहरातील शास्त्रज्ञांनी दिले अपडेट
Aditya L1 Mission ISRO
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 1:24 PM

पुणे | 2 सप्टेंबर 2023 : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) आदित्य एल-1 मिशनला शनिवारी सुरुवात झाली. भारताचे आदित्य यान सूर्याकडे यशस्वीपणे झेपावले. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य एल-1 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण होताच शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. आता हे याच जवळपास चार महिन्यात इच्छित स्थळी पोहचणार आहे. या यानावर लावलेले पेलोड पुणे येथे तयार झाले आहे.

पेलोड रोज किती फोटो पाठवणार

सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 मिशन सुरु झाले. आदित्य यान ‘व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ’ (वीईएलसी) निर्धारित स्थळी पोहचल्यावर विश्लेषणाचे काम सुरु होणार आहे. यानावर लावलेले पेलोड इस्त्रोच्या केंद्रावर रोज 1,440 फोटो पाठवणार आहे. यानासोबत 7 पेलोड आहेत. त्यातील चार सूर्याच्या प्रकाशाचे निरिक्षण करणार आहे तर तीन प्लाज्मा म्हणजेच चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. पृथ्यीपासून 15 लाख किलोमीटर लांब राहून पेलोड हे काम करणार आहे.

एका मिनिटात एक फोटो

आदित्य एल1 मधील शास्त्रज्ञ डॉ. मुथू प्रियाल यांनी म्हटले की, प्रत्येक मिनिटाला एक फोटो पेलोड पाठवणार आहे. म्हणजेच 24 तासांत 1,440 फोटो येणार आहेत. पुणे येथील ‘इंटर-युनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्समधील दोन शास्त्रज्ञ दुर्गेश त्रिपाठी आणि ए.एन. रामप्रकाश यांनी पेलोडचा कामाचे आपण विश्लेषण करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

यासाठी महत्वाची ठरणार मोहीम

सूर्य आणि पृथ्वी दरम्यान पाच लॅग्रेंजियन पाईंट आहे. त्याला ‘एल1′ म्हटले जाते. या ठिकाणावरुन सूर्याचे तापमान, सूर्यावर होणाऱ्या हालचाली, भूकंप, अंतराळातील हवामान यासंदर्भात अभ्यास या ठिकाणांवरुन केला जाणार आहे. चार महिन्यात यासंदर्भातील माहिती मिळण्यास सुरुवात होणार आहे. पेलोडमध्ये सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलीस्कोप म्हणजेच SUIT च्या माध्यमातून डेटाचे विश्लेषण केले जाणार आहे. जगभरातील शास्त्रज्ञ SUIT कडून मिळालेल्या डेटाची वाट पाहत आहे. यामुळे भारताची ही मोहीम अधिकच महत्वाची समजली जात आहे.

'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....