AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई डबा द्यायची, तो डबा स्वारगेटला यायचा अन् मी…; शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा

Sharad Pawar on Old Memory : पुण्यातील एका पुरस्कार वितरण सोहळ्यात शरद पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कॉलेजमध्ये असतानाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. स्त्रियांना संधी मिळाल्यास त्या देखील चांगलं काम करतात, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. वाचा सविस्तर...

आई डबा द्यायची, तो डबा स्वारगेटला यायचा अन् मी...; शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा
शरद पवार
| Updated on: Jun 22, 2024 | 4:11 PM
Share

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात यशस्विनी सन्मान सोहळा 2024 पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू केलेल्या महिला धोरणांची तीन दशके या आढावात्मक पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या तर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आई शारदाबाई पवार यांच्यासोबतच्या आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला आहे.

जुन्या आठवणींना उजाळा

माझे शिक्षण लहान गावात झालं. आम्ही सात भाऊ आणि चार बहिणी आमच्या घरात सगळ्यात शिकलेली व्यक्ती माझे सर्वात वरिष्ठ बंधू…. पाचवीपर्यंत शिक्षण गावाकडे घेतल आणि नंतरच शिक्षण घ्यायला पुण्यात आलो. आई सकाळी डबा द्यायची आणि सकाळी सात वाजता एसटीने डबा यायचा. स्वारगेटला मी जाऊन डबा घेऊन यायचो अन् मग आमचं जेवण व्हायचं. असे ते दिवस होते, असं शरद पवार म्हणाले.

आम्ही अभ्यास करतो का नाही, पाहायला आई कॉलेजला यायची. तिथं येऊन प्राध्यापकांना विचारायची की हा अभ्यास करतो का?, असं आईने आम्हाला सगळ्यांना शिकवलं. कर्तुत्वाचा मक्ता हा फक्त पुरुषांकडे नसतो. संधी मिळण्याची आवश्यकता आहे. संधी मिळाली तर स्रिया देखील कर्तुत्व दाखवतात. हे आज सिद्ध झालं, असं शरद पवार यांनी म्हटलं.

जे काही केलं ते आईमुळे- शरद पवार

माझ्या कुटुंबात आम्हा सर्व भावंडांना शिक्षणाचे दरवाजे उघडले ते, आमच्या आईने…. आम्हा सात भावांच्यामध्ये तिघांना पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत. आप्पासाहेब पवार आणि प्रतापराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तर मला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. आम्हा तिघांना हे पुरस्कार मिळाले तेव्हा मी सत्तेत नव्हतो. या पुरस्कारापंर्यत पोहचु शकलो कारण त्यामागे आमची आई आहे, असं शरद पवार म्हणाले.

महिलांसाठी आरक्षण आणि लष्करात, हवाई दलात, नेव्हीत महिलांना संधी देणं हे मी घेतलेले दोन निर्णय माझ्या कायम माझ्यास्मरणात राहणार आहेत. मुली हवाई दलात मुली दाखल झाल्यानंतर , हवाई दलातील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. विधानसभेत , लोकसभेत महिलांना संधी मिळायला हवी. आज त्याची गरज आहे. त्यामुळे संसदीय व्यवस्थेची झालेली दुरावस्था दुर होईल, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.